जगातील दुसरे सगळ्यात महागडे घर आहे मुकेश अंबानी यांचे, वाचा त्याच्याबद्दल काही खास गोष्टी
जगातील सर्वात मोठ्या उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट असलेल्या मुकेश अंबानी यांच्याकडे अब्जावधींची संपत्ती आहे. सध्या ते खुप चर्चेत आहेत कारण लॉकडाऊनमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये खुप वाढ झाली आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या उद्योगामध्ये पैसै गुंतवले आहेत त्यामुळे त्यांच्या संपत्तीत खुप वाढ झाली आहे.
अनेक उद्योगपती लॉकडाऊनमध्ये घाट्यात चालले आहेत तर दुसरीकडे मुकेश अंबानी यांनी फक्त एका आठवड्यात ४०० ते ५०० कोटींच्या आसपास पैसै कमावले आहेत. सध्या ते जगातील दहावे श्रीमंत व्यक्ती आहेत.
मुकेश अंबानींच्या संपत्तीची झलक त्याच्या कपड्यांपासून ते जीवनशैली आणि घरापर्यंत प्रत्येक गोष्टीत दिसते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासमवेत अँटीलिया या बंगल्यात राहतात.
आता सगळ्यांना माहिती आहे की हा जगातील दुसऱ्या सगळ्यात महागडा बंगला आहे. दक्षिण मुंबईच्या अतिथी क्षेत्रात अँटीलिया हा त्यांचा बंगला आहे. जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक असलेल्या अँटिलीयामध्ये २७ मजले आहेत.
लक्झरीच्या सर्व वस्तू या घरात आहेत. मीडिया रिपोर्टनुसार ‘अँटिलीया’ च्या देखभालीसाठी दरमहा अडीच कोटी रुपये खर्च केले जातात. हा बंगला दक्षिण मुंबईतील अल्टामाउंट रोडवर आहे. वोग मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार मुकेश अंबानी यांच्या घराच्या ‘अँटिलीयाची उंची ५७० फूट आहे.
२००६ मध्ये बांधले गेलेले हे घर अमेरिकन आर्किटेक्चर फर्म पर्किन्स आणि विल अँड हिर्श बॅडनर असोसिएट्सच्या मदतीने डिझाइन केले गेले होते. मुकेश अंबानी यांच्या घराचे नाव अँटीलिया हे अटलांटिक महासागरामध्ये असलेल्या बेटाच्या नावावरून देण्यात आलेले आहे.
या इमारतीचे इंटिरियर डिझायनिंग कमळ व सूर्याच्या आकारामध्ये केले गेले आहे. अँटिलियाची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की ८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपांचा सामना करू शकेल. मुकेश अंबानी यांचे घर जगातील दुसर्या क्रमांकाचे सगळ्यात महागडे घर आहे. बकिंघम पॅलेस पहिल्या क्रमांकावर आहे.
हे जगातील सर्वात लांब घर आहे, ज्यामध्ये केवळ एक कुटुंब राहते. व्होगच्या मते, या घराची किंमत २२.३ अब्ज डॉलर्स आहे. अँटिलियामध्ये ८० सीटर थिएटर तसेच स्पा रूम, हँगिंग टेरेस गार्डन, लॉबीमध्ये ९ लिफ्ट आणि आइस्क्रीम पार्लर आहेत.
वर्कआऊटशी संबंधित प्रत्येक गोष्ट या घरात आहे. मग ती जिम असो किंवा जलतरण तलाव. अँटिलियाच्या छतावर ३ हेलिपॅड आहेत. मुकेश अंबानी यांच्या घरातही ६ व्या मजल्यावरील गॅरेज आहे, ज्यात सुमारे १६८ कार आहेत.
या सर्व मोटारी एंटीलियाच्या घराच्या सर्व्हिसिंग स्टेशनमध्ये आहेत. या घरात स्नो रेन रूमसुद्धा आहे. या रूममधल्या भिंतीमधून आर्टिफिशिअर बर्फाचे हिमनग बाहेर पडतात तसेच बर्फाचा पाउसही पडतो असे म्हटले जाते.
यावरून तुम्ही विचार करू शकता की जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात महागडे आणि मोठे घर कसे असेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.
महत्वाच्या बातम्या
अरे, हा तर शाका लाका बुम बुम मधला संजू, वाचा काय काम करतो आता किंशुक वैद्य
५ ते १० रूपयांचे हे स्वस्त सामान विकून कमावले करोडो रूपये, वाचा पती-पत्नीची यशोगाथा
भारतातील या तज्ञाने बनवल्या आहेत शेणापासून सिमेंट, विटा, पेंट; आता इतरांना देतोय प्रशिक्षण
सलमान खानच्या जुडवा चित्रपटापासून चर्चेत आली होती रंभा, आता अभिनय सोडून करते ‘हे’ काम
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: