प्रदीप शर्मा यांना एनआयए कोर्टाकडून मिळाला 'हा' दिलासा
मुंबई: अँटिलिया स्फोटकं आणि हत्या प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले माजी पोलीस अधिकारी यांना अटक करण्यात आली असून त्यांची सध्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या अनुषंगाने शर्मा यांनी वकिलास भेटण्याची परवानगी मागितली असता त्यांना कोर्टाकडून दिलासा देण्यात आला आहे. ( ) वाचा: ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरन हत्या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली असून एनआयए कोर्टाने त्यांना २८ जूनपर्यंत कोठडी दिली आहे. दरम्यान वकिलास भेटण्याची परवानगी मिळावी म्हणून शर्मा यांनी एनआयए कोर्टात अर्ज सादर केला होता. यावर आज सुनावणी झाली असता कोर्टाने शर्मा यांना दिलासा दिला. प्रदीप शर्मा त्यांच्या वकिलांना दररोज दुपारी १२ ते १२.२० या वेळेत भेटू शकतात, असे परवानगी देताना कोर्टाकडून नमूद करण्यात आले आहे. वाचा: याच प्रकरणात अटक करण्यात आलेले व सध्या पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले सुनील माने यांना २५ जूनपर्यंत एनआयए कोठडी देण्यात आली आहे. सुनील माने यांची प्रदीप शर्मा यांच्या समक्ष चौकशी करायची असल्याने त्यांना एनआयए कोठडी देण्यात यावी, अशी विनंती एनआयए मार्फत करण्यात आली होती. ही विनंती विशेष एनआयए कोर्टाने मान्य केली. नेमकं काय आहे प्रकरण? उद्योगपती यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती. ही बाब उघड झाल्यानंतर हे प्रकरण नाट्यमय वळणे घेत आहे. त्यात स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरनची हत्या झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच गंभीर बनलं. यांच्यासह गुन्हे शाखेतील त्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक झाल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढतच चालली आहे. १८ जून रोजी याप्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली. हिरन हत्येप्रकरणात शर्मा हे मास्टरमाइंड असल्याचा संशय एनआयएला असून ठोस पुरावे हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: