बडोद्याच्या महाराणींनी लॉकडाऊन मध्ये खेडोपाडच्या शेकडो विणकाम कारागिरांना ब्रँड बनवलं

June 28, 2021 , 0 Comments

भारताचा इतिहासच एवढा रॉयल आहे कि, आपण नेहेमीच याबाबत मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने सांगत असतो. आपल्या इतिहासात अनेक महाराजा, महारानी आणि राजवाडे होऊन गेले आहेत.

स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलीनीकरण झाले आणि राजघराण्यांचे सरकारी तनखे बंद झाले. परंतु आजही हे राजेशाही घराण्याबद्दलचे स्थानिक जनतेच्या मनातले प्रेम आणि आदर अजूनही कमी झालेला नाही.

या राजघराणे आणि त्यांच्या राहणीमानाची अनेकांना उत्सुकता, ओढ असते.

अजूनही या रॉयल राजघराण्यांबद्दलच्या गोष्टी सामान्य जनतेला माहिती करून घेण्याची ओढ असते. आजच्या काळातही काही महाराणींना महत्व दिले जाते. त्यातल्या एक महाराणी म्हणजेच राधिका राजे गायकवाड ज्यांनी बडोद्याचे महाराजा सिमरजितसिंग राव गायकवाड यांच्याशी विवाह केला होता. आज आपण बडोद्याचे महाराजा सिमरजितसिंग गायकवाड यांच्या महाराणी राधिका राजे यांच्याबद्दल बोलणार आहोत. .

फोर्ब्स मासिकाने त्यांना इंडियन किंगडम राजवंशातील सर्वात सुंदर महिला म्हणून घोषित केले आहे.

शिवाय मिलियनेरेसिया मासिकामध्ये त्यांचा “मॉडर्न महाराणी” म्हणून गौरव केला आहे.

 

 

राधिका राजे या वानकनेरच्या महाराजकुमार डॉ. रणजितसिंहजी यांची कन्या, राधिका राजे यांचा २००२ मध्ये महाराजाशी विवाह झाला. रॉयल्टीमध्ये जन्मलेल्या राधिका यांचा विवाह देखील एका रॉयल घराण्यातच झाला. त्यांच्या कुटुंबाचा मोठा इतिहासही आहे, त्यांनी इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे आणि विवाहापूर्वी अग्रगण्य मासिके आणि टाईम्स ऑफ इंडिया दैनिकासाठी पत्रकार म्हणून कामही केले होते. असो

त्यांच्यावर बोलण्याचे निमित्त म्हणजे आपल्या भिडूने राधिका राजेंची एक इंस्टाग्राम पोस्ट पाहिलीआणि विचार केला कि, त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहचवावी…

त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं कि, त्या राजघराण्यातील सदस्य असूनही त्यांनी काय संघर्ष केला याबद्दल लिहिलं.

त्या म्हणतात, “माझा जन्म वानकनेर राजघराण्यात झाला असला तरीही माझे आयुष्य विलक्षण होते. आयएएस अधिकारी होण्यासाठी बाबांनी आपली राजेशाही पदवी सोडून दिली. जेव्हा भोपाळ गॅस दुर्घटना झाली तेव्हा ते तिथेच रुजू होते. आम्ही भोपाळ सोडू शकलो असतो पण बाबांनी असं केलं नाही त्यांनी निर्भिडपणे लोकांना तेथून हलविण्यात मदत केली तेंव्हा मी 6 वर्षांची होते. त्या घटनेमध्ये मी शिकले कि, आपण हात-पाय हलवल्याशिवाय काहीही साध्य करू शकत नाही.

काही वर्षांनंतर आम्ही दिल्लीला शिफ्ट झालोत, तेंव्हा आम्ही स्वतंत्र आणि सामान्य आयुष्य जगलो. तेंव्हा मी सार्वजनिक बसमधून शाळेत जात असे. पण जेव्हा मी वानकनेरला तेंव्हा, मला खूप अटेन्शन मिळायचे ते नको वाटायचे. पण मला नेहमीच स्वतःच्या पायावर उभे रहायचे होते.

“पदवी घेतल्यानंतर मला इंडियन एक्स्प्रेसमध्ये नोकरी मिळाली. २० व्या वर्षी मी काम करणारी कुटुंबातील पहिली महिला होती; माझ्या चुलतबहिणींपैकी सर्वांनी २१ वर्षांमध्ये लग्न केले होते! पत्रकार म्हणून काम करताना मला माझ्या आईवडिलांचा सपोर्ट होता. त्यानंतर मी मास्टर्सही पूर्ण केले

काही वर्षांनंतर जेव्हा माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी वर शोधण्यास सुरवात केली तेव्हा त्यांना माहित होते की मला स्वतंत्र आणि स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. मी काही मुलांना भेटले होते परंतु सर्वांमध्ये बडोद्याचे राजकुमार समरजितच्या हे मात्र वेगळे होते, स्वतंत्र विचारांचे. जेव्हा मी त्यांना सांगितले की मला आणखी शिक्षण घ्यायचे आहे तेव्हा त्यांनी मला प्रोत्साहन दिले.

परंतु तुम्हाला आम्ही असं सांगितलं तर खोटं वाटायला नको, बडोद्याच्या महाराणी आजकाल साड्यांचा बिझनेस करतात, त्यांचे साड्यांचे काही मोठ-मोठाले प्रदर्शनही भरतात.

हो …. श्रीमती गायकवाड सांगतात की, लग्नानंतर आणि बडोद्याच्या लक्ष्मीविलास पॅलेसमधल्या स्वावलंबी असणारी मी पहिली महिला आहे.

“बडोदा राजवाड्यामध्ये भिंतींवर राजा रवी वर्मा पेंटिंग्ज होत्या, त्या फक्त सुशोभीकरण करून म्हणून लावल्या असल्या तरी त्याचे महत्व मोठे होते. म्हणून मी विचार केला, ‘या चित्रांनी प्रेरित असलेल्या जुन्या विणकाम तंत्रांचे पुनरुज्जीवन करायला काय हरकत आहे?'”

आणि अशाप्रकारे त्यांना एक कल्पना सुचली…

त्या स्थानिक कामगारांना एकत्रित करण्यासाठी गावोगावी फिरल्या. यात त्यांच्या सासू देखील होत्या. स्थानिक विणकरांना घेऊन, मुंबईतील त्यांचे पहिले साड्यांचे प्रदर्शन लावले आणि प्रदर्शनातल्या सगळ्या साड्या विकल्या गेल्या.

लॉकडाऊन दरम्यान, या विणकरांचे हातातले काम गेले. उदरनिर्वाहाचे साधन गमावलेल्या अशा कारागीरांना मदत करण्यासाठी त्या समोर आल्या. त्या अशा परीस्थितीत त्या खेडोपाडी फिरल्या सोबत त्यांची बहिणही होती. कामगारांच्या दुर्दशेविषयी सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली. लोकांनीही मोठ्या संख्येने मदत केली. काही महिन्यांत त्यांनी ७०० पेक्षा जास्त कुटुंबांना आधार देऊ शकल्या.

राजघराण्यातील महाराणी स्वतः लक्ष घालत असल्यामुळे या विणकाम करणाऱ्या कारागिरांचा ब्रँड तयार झाला आणि तो जगभरात फेमस देखील झाला.

त्या म्हणतात देखील, लोकांना वाटतं महाराणी म्हणजे मुकुट घातलेली एक स्त्री, परंतु वास्तव वेगळंच असतं. ते रॉयल घराणे जसे बाहेरून दिसते तसे अगदीच चमचमीत नसते. राजघराण्यातील सदस्यांना देखील सामान्य लोकांसारखे विचार आणि जाणीव असते”. त्यांचे हे विचार नक्कीच त्यांना मॉडर्न महाराणीच्या प्रतिमेमध्ये खरे उतरवतात.

त्यांना आधुनिक भारतातील महाराणी म्हणण्यास त्यांचे प्रामाणिक विचार महत्वाचे ठरतात, त्या म्हणतात,

“मी पारंपारिक रूढी मोडल्या, परंतु मी माझ्या स्वतःच्या सीमारेषा सेट केल्या आहेत आणि मुख्य म्हणजे मी माझ्याकडून हाच वारसा माझ्या मुलींकडेही जात आहे. त्यांना पाहिजे तसे आयुष्य  निवडण्यासाठी मी त्यांना प्रोत्साहन देते आणि जो निर्णय घ्याल त्यासाठी पश्चाताप करण्यासाठीची अज्जिबात गरज नसल्याचे हि मी त्यांना सांगते”.

हे ही वाच भिडू.

 

The post बडोद्याच्या महाराणींनी लॉकडाऊन मध्ये खेडोपाडच्या शेकडो विणकाम कारागिरांना ब्रँड बनवलं appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: