‘राजे असतील तर रयत दिसली पाहिजे, ती कुठेच दिसत नाही’; राणेंची संभाजीराजेंवर जोरदार टीका

June 04, 2021 , 0 Comments

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बाचाबाची सुरू आहे. भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी मात्र यावरून थेट मोदींवर नाराजी व्यक्त केली होती. मोदींनी भेटीसाठी वेळ दिली नाही, असे त्यांनी म्हटले होते.

आता संभाजी राजेंवर नारायण राणे यांनी आज घणाघाती टीका केली. तर काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी  पंतप्रधानांवर परत टीका केली तर आम्ही वाजवून टाकू असा थेट इशारा देखील त्यांनी दिला. यामुळे आता वातावरण चिघळले आहे.

राणे म्हणाले, समाजाला वाटले पाहिजे की हे राजे आहेत आमचे. ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. आता त्यांनी राजीनामा देऊ नये. रायगडावर कोण आहेत हो? आंदोलन लोकांमध्ये करावे. पेटवायला पण एक धमक लागते. खासदारकी संपता संपता हे सगळे कसे आठवायला लागले. मला त्यांचा मुद्दा पटला तर मी जाईन.

तसेच राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला. ती कुठे दिसत नाही. जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन कोणी नेता होत नाही, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे मराठा आरक्षणावरून आक्रमक झाले आहेत.

संभाजीराजे यांनी राज्यात दौरा करून अनेकांच्या भेटी घेतल्या. तसेच राज्यातील प्रमुख नेत्याच्या देखील भेटी घेतल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांची त्यांनी भेट घेतली.

मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावरून मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे.

ताज्या बातम्या

काश्मीरमध्ये भिक्षेकरी महिलेच्या झोपडीत सापडला पैशांचा ढीग, पैसे मोजताना पथकाला फुटला घाम

सातारकराचा कारनामा! आयफोनवर शुट केला स्ट्रगलर्सची कहाणी सांगणारा ‘पिच्चर’, वाचा त्याची कहाणी

गांगुलीची दहा दिवस समजूत काढल्यानंतर भारताला मिळाला होता माहीसारखा खेळाडू, वाचा पुर्ण किस्सा


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: