मोठी बातमी! आजपासून १८ वर्षांपुढील लोकांचे लसीकरण सुरू, अशी मिळेल मोफत लस जाणून घ्या..
मुंबई । देशभरात आजपासून केंद्र सरकार प्रत्येक राज्यात १८ वर्षांहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करणार आहे. यामुळे अनेक दिवसांपासून यावर चर्चा सुरू होती. कोरोना लसींचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांकडून एकूण लसीच्या ७५ टक्के भाग भारत सरकार स्वतः खरेदी करुन राज्य सरकारांना मोफत देणार आहे.
तसेच २५ टक्के लसीचे डोस खाजगी रुग्णालय विकत घेऊ शकणार आहेत. याबाबत आता परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. यामुळे आता लसीकरण वाढणार असून कोरोनाला यामुळे आळा बसणार आहे. लसीकरण हाच कोरोनावर एकमेव उपाय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला संबोधित करताना १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण भारत सरकार मोफत करणार असल्याचे सांगितले होते. देशातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.
यामुळे आजपासून सर्वांना केंद्राकडून मोफत लस दिली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारला लसीकरणासाठी काहीही खर्च करावा लागणार नाही. येत्या २ आठवड्यांत ही व्यवस्था लागू केली जाईल. या दोन आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील.
आजपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या पुढील टप्प्यात Cowin.gov.in वर आधीच रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. सर्व सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रावर ही सुविधा देण्यात आली आहे. यामुळे आपला वेळ जाणार नाही.
केंद्राने दिलेल्या लशींची मात्रा आता राज्य १८ वर्षांवरील सर्वांना मोफत देणार. यादरम्यान स्वास्थ कर्मचारी, कोरोना योद्धे, ४५ वर्षांचे नागरिक त्याशिवाय ज्यांचा दुसरा डोस शिल्लक आहे, आदींना लसीकरणात प्राधान्य दिले जाईल. या पद्धतीने लवकरात लवकर लसीकरण उरकले जाईल.
ताज्या बातम्या
पुण्यात पत्नीचा आंघोळ करतानाचा विडिओ काढत होता पती, धक्कादायक कारण आले समोर..
‘दे धक्का’ मधील शुक्राची चांदणी आहे सिनेसृष्टीपासून लांब; कारण जाणून आश्चर्य वाटेल
मोठी बातमी! शिवसेना आमदाराचा लेटरबॉम्ब, म्हणाले, भाजपशी जुळवून घ्या, आमचा त्रास वाचेल
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: