मोबाइल नेटवर्कसाठी विद्यार्थी झाडावर चढले होते; वीज कोसळली आणि...

June 29, 2021 0 Comments

डहाणू: मोबाइल नेटवर्कच्या शोधात झाडावर चढलेल्या मुलांच्या अंगावर वीज पडून घडलेल्या भीषण दुर्घटनेत एकाचा मृत्यू, तर तीन जखमी झाली आहेत. तालुक्यातील ओसरविरा गावात आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. ( ) वाचा: डहाणू तालुक्यात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकटाला सुरुवात झाली. यादरम्यान, तालुक्यातील ओसरविरा गावच्या मानकरपाडा येथील काही मुलं मोबाइल रेंज मिळावी म्हणून उंबराच्या झाडावर चढली होती. सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास या झाडावर वीज कोसळली आणि भीषण दुर्घटनेला या मुलांना सामोरं जावं लागलं. वीज अंगावर कोसळून (वय १६) याचा जागीच मृत्यू झाला तर चेतन मोहन कोरडा (वय ११), दीपेश संदीप कोरडा (वय ११) आणि मेहुल अनिल मानकर (वय १२) हे तिघे जखमी आहेत. यापैकी चेतन आणि दीपेश या दोघांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मेहुल याला अधिक उपचारासाठी येथील वेदांत हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे. वाचा: दरम्यान, ही सर्व शाळकरी मुले असून मृत पावलेला रविन हा इयत्ता नववी शिकत होता. जखमी विद्यार्थी हे सहावी ते आठवी इयत्तेत शिकणारे आहेत. या गावात मोबाइला रेंज येत नसल्याने ही मुले पाड्यापासून दीड किमी अंतरावर झाडावर चढून नेटवर्क मिळविण्याच्या प्रयत्नात होती. तर काही झाडाखाली खेळत असताना ही घटना घडली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: