“आम्ही जगायचं कस बस्स झालं आता कोविड कोविड, अकाऊंटमध्ये फक्त ४०० रुपये आहेत…”

June 28, 2021 , 0 Comments

मुंबई । कोरोनामुळे अजूनही परिस्थिती पूर्वरत झाली नाही. अनेकांचे मोठे हाल सुरू आहेत. अनेक कुटूंब उध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परेल स्टेशनवर तिकीट नसल्या कारणाने या तरुणाला टिसीने पकडले आहे. यामुळे त्याने एक व्हिडिओ तयार केला.

यामुळे त्याच्याकडून दंड भरण्याची मागणी करीत आहे. त्यानंतर तरुणाने व्हिडीओच्या माध्यमातून आपला अनुभव सर्वांसमोर मांडला आहे. यामध्ये गेल्या दीड वर्षांपासून नोकरी नसल्यामुळे घरातच असल्याचे त्याने सांगितले आहे. या दरम्यान आई-वडिलांचे बोलणे खावे लागत होते. असे त्याने सांगितले.

असे असताना मात्र अजूनही सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी नाही. दरम्यान अनेक जणांना दंड ठोठावण्यात येत आहे. या तरुणालाही असाच अनुभव आला. त्याने आपल्या मनातील दु:ख या व्हिडीओच्या माध्यमातून समोर मांडले आहे. तो कोणत्या परिस्थितीतुन जात आहे हे त्याने सांगितले आहे.

अनेक प्रयत्न करुन दुसरी नोकरी मिळाली, मात्र नोकरीच्या दुसऱ्या दिवशी त्याच्याकडून दंडाची मागणी केली जात आहे. त्याच्या अकाऊंटमध्ये अवघे ४०० रुपये असल्याचे त्याने सांगितले. एकेकाळी ३५ हजार रुपये कमावणारा मी, आता माझ्या अकाऊंटमध्ये अवघे ४०० रुपये असल्याचे दु:ख त्याने व्यक्त केले आहे. त्याने हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

असा प्रसंग अनेकांवर रोज येत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर दुसरी शोधून कामात रुजू व्हायचे तर लोकल बंद, अशा वेळी भविष्याचा ज्वलंत प्रश्न तरुणांसमोर आ वासून उभा आहे. यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात अनेक महिन्यांपासून लोकल बंद आहेत. यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशात अनेकांना नोकरीवर जावे लागत आहे. सरकारी नोकरदारांना जाऊन दिले जात आहे. मात्र खाजगीत काम करणाऱ्यावर मात्र कारवाई केली जाते.

ताज्या बातम्या

ओबीसी आरक्षणाचा वाद पेटला, आता वडेट्टीवारांचे धक्कादायक विधान, म्हणाले ओबीसी असल्याने..

इंडिअन आयडल १२: गीतकार जावेद अख्तर घेणार अरुणीताची परीक्षा, अरुणीताच्या करियरवर होईल याचा परिणाम

धक्कादायक! नवऱ्याला डाळ आवडली नाही म्हणून बायकोने डोक्यात घातली वीट, नवऱ्याचा  मृत्यू


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: