मोदी सरकारची अदानीवर मेहेरबाणी! विमानतळ वापराचे दर १० पटींनी वाढवण्यास दिली परवानगी

June 03, 2021 , 0 Comments

नवी दिल्ली । एकीकडे देशात महागाई वाढत असताना आता विमानसेवेबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. आता अदानी समूहाने विमानतळांच्या खासगीकरण मोहिमेअंतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून सहा विमानतळे ताब्यात घेतली आहेत. यामुळे विमानतळावर दरवाढ होण्याची शक्यता आहे.

यामध्ये अदानी समूह लवकरच त्यांच्या ताब्यातील विमानतळांवरील भाड्याचे दरही वाढवण्याची चिन्हे आहेत. जयपूर विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम विमानतळ, गुवाहाटीमधील विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश आहे.

या विमातळांच्या देखभाल आणि हताळणीचे कंत्राटं ५० वर्षांसाठी अदानी समूहाला देण्यात आले आहे.
याबाबत २०१९ साली फेब्रुवारी महिन्यात करार झाला होता. यामुळे ते लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. याला आता विरोध होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापैकी लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भाड्यामध्ये कंपनीने १० पटींने वाढ केल्याचे समोर आले आहे. विमानतळाकडून चार्चेसमध्ये मोठी वाढ केल्याने याचा फटका खासगी तसेच आंतरराष्ट्रीय विमानांना बसणार आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून सहा विमानतळांचा कारभार ५० वर्षांसाठी अदानी समुहाकडे देण्यात आला आहे. यामुळे आता विरोधक मोदी सरकारवर टीका करण्याची शक्यता आहे. २०१९ सालीच याबाबत निर्णय घेतला गेला होता.

अदाणी समूह गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मोदी सरकार त्यांच्यावर मेहेरबान असल्याचे सतत सांगितले जाते. यावरून टीका देखील केली जाते. अशातच हा विमानतळाचा निर्णय झाल्याने आता पुन्हा एकदा टीका केली जात आहे.

ताज्या बातम्या

राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा! ५० लाखांचे पहिले बक्षीस, जाणून घ्या..

कोरोनाची तिसरी लाट असणार भयानक, ‘एवढे’ बळी जाणार; एसबीआयने दिली धक्कादायक माहिती

एवढ्या वर्षांनंतर आमिरने खानने सांगितले त्याच्या आणि सलमानच्या दुश्मनीचे कारण


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: