मुंबईत सक्रिय रुग्णसंख्या घटली; आकडेवारीतील बदल चिंता वाढवणारा

June 26, 2021 0 Comments

मुंबई: क्षेत्रात संसर्गाचा ग्राफ खाली आला असला तरी नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याने काहीशी चिंता निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ६९३ नवीन करोना बाधित रुग्णांची भर पडली आहे तर त्याचवेळी ५७५ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. मुंबईत करोनाने आणखी २० रुग्ण दगावले असून मृतांची एकूण संख्या आता १५ हजार ३६८ इतकी झाली आहे. ( ) वाचा: मुंबईसाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे आता १० हजारांपर्यंत खाली आली आहे. सध्या महापालिका क्षेत्रात करोनाच्या १० हजार ४३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून ९५ टक्क्यांवरच असून ०.०९ टक्के इतका आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी आता ७१३ दिवसांवर गेला आहे. वाचा: मुंबईत गुरुवारी नवीन बाधितांच्या तुलनेत करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होती. शुक्रवारच्या आकडेवारीतही त्यात फारसा फरक दिसला नाही. दिवसभरात ६९३ नवीन रुग्णांची भर पडली तर ५७५ रुग्ण करोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतले. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ९२ हजार २४५ रुग्णांनी करोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. मुंबईत आज ३० हजार ८९८ कोविड चाचण्या करण्यात आल्या. शहर आणि उपनगरातील चाळी व झोपडपट्ट्यांमधील सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या आता ९ पर्यंत खाली आली आहे. पाचपेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेल्या ९२ इमारती सध्या सील करण्यात आलेल्या आहेत. वाचा: शुक्रवार संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती २४ तासात बाधित रुग्ण - ६९३ २४ तासात बरे झालेले रुग्ण - ५७५ बरे झालेले एकूण रुग्ण - ६९२२४५ बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९५% एकूण सक्रिय रुग्ण- १०४३७ रुग्ण दुप्पटीचा कालावधी- ७१३ दिवस कोविड वाढीचा दर ( १८ जून ते २४ जून)- ०.०९ % वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: