…तर पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू; मराठा आरक्षणप्रश्नी नरेंद्र पाटलांचा ठाकरे सरकारला इशारा

June 06, 2021 , 0 Comments

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारवर टिका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच शनिवारी बीडमध्ये मराठा आरक्षण मिळवण्यासाठी विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारो नागरीकांनी मोर्च्यामध्ये सहभाग घेतला होता.

मराठा आरक्षणासोबतच इतर मागण्या ५ जूलैपर्यंत पुर्ण कराव्यात. जर मागण्या मान्य झाल्या नाही, तर आगामी पावसाळ आधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. यावेळी नरेंद्र पाटीलही आक्रमक भुमिकेत दिसून आले आहे.

मराठा आता शांत बसणार नाही. वेळप्रसंगी पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाच्या भाषणात ते बोलत होते.

तुमच्यासारखा जातीवंत माणूस आणि कट्टर मराठा आयुष्यात शांत बसणार नाही. वेळप्रसंग पडल्यास पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू, पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असे विनायक मेटे यांनी म्हटले आहे.

तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात असल्याचे वेळोवेळी कृतीतून दिसून आले आहे. स्व. अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी आत्मबलिदान दिल्यानंतर देखील हा प्रश्न मार्गी न लागण्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कारणीभूत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, बीडमध्ये निघणाऱ्या या मोर्चासाठी चांगलीच तयारी करण्यात आली होती. मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी पोलिसांनी कडेलोट बंदोबस्त असणार आहे. तसेच बीडमध्ये एसआरपीएफच्या तुकडीसोबतच ५३१ पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारतीय राजकारणाच्या इतिहासातील सगळ्यात भयंकर बदला, जो जयललिता यांनी घेतला होता
पुण्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू, सोमवारपासून ‘या’ गोष्टी राहणार चालू आणि ‘या’ गोष्टी राहणार बंद
एका ताडी बनवणाऱ्याचा मुलगा कसा बनला केरळचा मुख्यमंत्री, वाचा पिनाराय विजयन यांची यशोगाथा


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: