“माझ्या हातात सुत्र दिल्यास ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळुन देईल, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईल”

June 27, 2021 , 0 Comments

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी भाजपच्या मोठ्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून चक्काजाम आंदोलन काल करण्यात आले आहे. भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सरकारला विरोध करत रस्त्यावर उतरले होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वात नागपुरचे आंदोलन पार पडले आहे. आंदोलनादरम्यान फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. माझ्या हातात सुत्र दिली, तर ओबीसींना आरक्षण मिळवून देईल, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय, पण माझ्या हातात पुन्हा दिली तर मी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईल, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईल, असे मोठे व्यक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, अशा मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन पार पडले आहे. नागपुरच्या आंदोलनात फडणवीसांनी काँग्रेसला लक्ष्य केलं होतं.

महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगड, राजस्थानमध्ये ओबीसी आरक्षण सुरु आहे. मग फक्त महाराष्ट्रातीलच ओबीसी आरक्षण रद्द का झालं? असा सवालही फडणवीसांनी सरकारला केला आहे.

भाजपचे आज १५०० ठिकाणी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. या सरकारला आता ओबीसी आरक्षण द्यावे लागेल, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल, असा इशाराही फडणवीसांनी आघाडी सरकारला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

video; आरोग्यमंत्र्यांचं बिंग फुटलं, महिला सहकाऱ्यासोबत घट्ट किस करताना CCTV त कैद
‘या’ अधिकाऱ्याची बेनामी संपत्ती मोजून पोलीसची चक्रावले, ४० हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल…
काय म्हणावं याला! नवऱ्याला घोड्यावर चढता आलं नाही म्हणून नवरीने केलं असा काही की…


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: