VIDE0: कोरोना रुग्ण एका झटक्यात बरा होणार! औषधासाठी तोबा गर्दी, ICMR करणार चाचणी
हैदराबाद | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येक जण उपचार शोधतो आहे. अशात डोळ्यात औषध टाकल्यानंतर ऑक्सिजनची पातळी वाढवणारे औषध नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपट्टणम येथील एका वैद्याने तयार केले आहे. हे औषध घेण्यासाठी हजारो लोक रांगा लावत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांचे होणारे हाल तसेच लोकांची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक परवड होत असताना आंध्र प्रदेशमधील ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष बाब म्हणजे लोकांना ते औषध मोफत दिले जात आहे. औषधामुळे लोकांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याने नेते, अधिकारी याचा लाभ घेत आहेत.
कोरोनावर जालीम उपाय समजली जाणारी ही वनौषधी घेण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. हे औषध घेण्यासाठी अत्यवस्थ रुग्ण चक्क अँम्ब्युलन्समध्ये बसून येत आहेत. आनंददया असे हे औषध देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. या औषधामुळे कोरोना बरा होतो असा त्याचा दावा आहे.
Huge crowd . current Suitation at krishnapatnam area for covid (Anandiah Ayurvedic medicine). #COVID19india #Nellore pic.twitter.com/aydzQurYzs
— Sai Mohan #RRR (@Sai_Mohan_999) May 21, 2021
जवळपास महिनाभर हे औषध रुग्णांना देण्यात आले. यानंतर स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी या औषधाची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या औषधावर बंदी घालण्यात आली होती. मात्र वाएसआरसीपी पक्षाच्या काकाणी गोवर्धन रेड्डी या आमदाराने या औषधाच्या वाटपाला पुन्हा सुरुवात केली.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या औषधाच्या वापरास सरकार प्रोत्साहन देण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. तर उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही याची दखल घेतली आहे. त्यांनी आयसीएमआर महासंचालक बलराम भार्गव यांच्याशी चर्चा केली आहे. औषधाचा अभ्यास करून वितरणाबाबत पावले टाकावीत अशी सूचना त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
तुमच्या भागात लस उपलब्ध आहे की, नाही Whatsapp वर कळणार; ‘ह्या’ नंबरवर फक्त एक मेसेज करा
कोरोनाने आपल्या जवळची माणसे गमावली; डॉक्टरांसोबत संवाद साधताना मोदींना आले रडू
मोठी बातमी! मुंबईत आढळले म्युकरमायकोसिसचे २९ रुग्ण, ४ रुग्णांचा झाला मृत्यु
0 Comments: