विराट आणि अनुष्काने १६ कोटींची मदत करत चिमुरडीचे वाचवले प्राण; जाणून घ्या पुर्ण किस्सा…

May 26, 2021 , 0 Comments

सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रेटी लोक मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात. कोरोना रुग्णांसाठी पण त्यांनी मोठा निधी उभा केला होता.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी पण लहान मुलाचे प्राण वाचवायला मदत केली आहे. अयांश गुप्ता नावाच्या तरुणाचे पण प्राण वाचवायला मदत केली आहे. स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी नावाच्या दुर्मिळ आजाराशी तो मुलगा लढत होता.

त्या आजारावरी औषध दुर्मिळ औषधांमधील एक होते. हे औषध तब्बल १६ कोटी रुपये किंमतीचे होते. दरम्यान एवढे महागडे औषध कसे मागवायचे यासाठी त्याच्या आई वडिलांनी हार मानली नाही.

त्यानंतर मग त्यांनी ट्विटरवर एक अकाउंट उघडले. त्या माध्यमातून त्यांनी मदत मागायला सुरुवात केली. AyaanshFightsSMA नावाने त्यांनी ट्विटरवर अकाउंट उघडले. त्यांनी ऑनलाईन फंडरेझर मोहीम पण उघडली.

त्या लहानग्यासाठी १६ कोटी रुपयांची गरज होती. एवढी मोठी मदत सोशल माध्यमातून जमा झाली आहे. अयांशच्या आई वडिलांनी ट्विटरवरून आभार मानताना पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी सर्व मदत करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

त्यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे आभार मानताना पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही चाहते म्हणून कायमच तुमच्यावर प्रेम केलं; पण अयांशसाठी आणि या मोहिमेसाठी तुम्ही जे काही केलं आहे, ते आमच्या अपेक्षेपलीकडचं आहे. खूप आभार. आयुष्याची ही लढाई षट्कार मारून जिंकण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केलीत. आम्ही कायमच तुमच्या ऋणात राहू,’

ताज्या बातम्या
ज्योतिषशास्त्र गुरुजींवर विश्वास ठेऊन ‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे यांनी केल दुसऱ्यांदा लग्न

सकाळी निर्णय, संध्याकाळी जीआर! कोरोना रोखण्यासाठी अजितदादा इन ॲक्शन मोड

ही तर पॅन्ट घालायची विसरली! कपड्यांमुळे ‘ही’ अभिनेत्री झाली ट्रोल, पाहा विडिओ


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: