आता डोक्याची कटकट मिटली! टोलवरून आता अवघ्या १० सेकंदात होणार सुटका, वाचा नवीन नियम

May 27, 2021 , 0 Comments

नवी दिल्ली । आपण कुठे बाहेर प्रवासाला जात असेल तर सर्वात जास्त टेन्शन हे टोल नाक्यावरील गर्दीचे येते. कारण टोल नाक्यावर पाच ते दहा किलोमीटरच्या रांगा कधी कधी आपल्याला बघायला मिळतात. यामुळे मोठा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. तसेच आपल्या वेळेचे गणित देखील कोलमडून जाते.

मात्र आता यातून सर्वांची सुटका होणार आहे. आता अवघ्या १० सेकंदात टोल प्लाझावरुन सुटका होणार आहे. तसेच १०० मीटर पेक्षा जास्त रांग नाही अशी खात्रीने जलद प्रवासाची हमी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण देणार आहे. यामुळे आता आपला वेळही वाचणार आहे.

याबाबत गाईडलाईन्स प्राधिकरणातर्फे काढण्यात आल्या आहेत. तसेच पुढच्या दहा वर्षांचा विचार करून टोल प्लाझांमध्ये बदलही करण्यात येणार आहेत. यामुळे या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. नवीन गाईडलाईन्स १०० टक्के वाहनांना फास्ट टॅग लागल्यानंतर या टोल प्लाझावर १० सेकेंदापेक्षा जास्त वाहनांना थांबवता येणार नाही.

तसेच १०० मीटर लांब रांग टोल प्लाझावर दिसू नये यासाठी नियम करण्यात आला आहे. गर्दीच्यावेळी विनाअडथळा प्रवास व्हावा या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता टोल नाक्यावर मोठी गर्दी होणार नाही.

टोल प्लाझावर रांगेची लांबी १०० मीटरपर्यंतच राहील याची काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी टोल प्लाझावर १०० मीटर लांब रांग ओळखण्यासाठी पिवळी पट्टी लावण्यात येणार आहे. जेणेकरुन टोल ऑपरेटरला जबाबदार धरणं सोपे जाणार आहे.

काही टोल प्लाझावर फास्टॅग १०० टक्के अनिवार्य केल्यावर प्रतीक्षा कालावधी नसला तरीही काही कारणास्तव १०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर वाहनांच्या रांग असल्यास वाहनांना टोल न भरताच पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल.

ताज्या बातम्या

तरुणीनं बारमध्ये लगावली आदित्य नारायणच्या थोबाडीत; पाहा प्रसिद्धीसाठी कसली घाणेरडी कृत्ये करतो

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; मुंबईतच आहेत दोन आलिशान बंगले

स्मार्टफोनच्या किंमतीत मिळत आहेत हिरो स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना; किंमत फक्त…


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: