इंडियन आयडल १२: अभिजीत सावंत नंतर आता मियांग चैंगने शोच्या वादावर प्रतिक्रिया दिली, म्हणाला आमच्या वेळेस…

May 31, 2021 , 0 Comments

‘इंडियन आयडल १२’ मध्ये  किशोर कुमार स्पेसिअल भाग चर्चेचा विषय ठरला होता. या भागात किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार पाहुणा म्हणून गेला होता. शोचा एक भाग झाल्यानंतर अमितने सांगितले होते की तो शो मला अजिबात आवडत नाही आणि निर्मात्यांनी सर्वांचे कौतुक करण्यास सांगितले. अमितच्या विधानानंतर बरेच वाद-विवाद झाले होते.

अमितच्या या वादानंतर या प्रकरणातील अनेक मुद्दे पुढे आले. आणि त्यागोष्टीवरूनही पुन्हा वाद निर्माण झालेले. अभिजीत सावंत यांनी यापूर्वी निर्मात्यांविरूद्ध बोलताना सांगितले होते की ते स्पर्धकांच्या कौशल्यापेक्षा त्यांच्या गरिबीला जास्त महत्व देतात.

आता या प्रकरणावर मियांग चैंग यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्वत: मियांगने इंडियन आयडॉलच्या ५ व्या सीझनमध्ये भाग घेतला होता. मियांगने सांगितले की तो शोच्या टीमशी बर्‍याच दिवसांपासून संपर्कात नव्हता, म्हणूनच त्याला या उल्लंघनाबद्दल माहिती नव्हती. मियांग चैंग सध्या आपल्या मित्रांसमवेत वेळ घालवत आहे.

मियांग म्हणाला, ‘मी ऐकलं आहे की या सिजनमधील गायक खूप प्रशिक्षित आहेत. हे गायक बर्‍यापैकी शक्तिशाली आहेत. आमचा सिजनअगदी सोपा होता आणि आमच्यापैकी कोणीही ग्लॅमरस जगाचे नव्हते. तसेच सोशल मीडियावर कोणताही एक्सपोजर नव्हता. त्यावेळेस काम अत्यंत सुरळीतरित्या केले जात होते.

मियांंग पुढे म्हणाले, ‘तसे तर सर्वानाच माहित आहे की रियलिटी शोमध्ये थोडा फार ड्रामा केला जातो. आमच्या वेळेस सर्व काही अगदी सोपे होते कारण त्यावेळी ग्लॅमर नव्हता.’ तसेच सगळ्यांचा भर कलेला महत्व देण्याकडे होता.

पूर्वी या विषयावर बोलताना अभिजीत म्हणाला होता, आजकाल मेकर्स टॅलेंट पाहत  नाहीत. निर्मात्यांना सर्वात महत्वाच TRP वाटत असते. या सगळ्याचा परिणाम ते स्पर्धकांच टॅलेंट न पाहता त्यांची गरिबी तसेच उणीवांवर भर देतात.

अभिजीत पुढे म्हणाले, प्रेक्षकांना पार्श्वभूमीबद्दल काही माहिती नसलेले प्रादेशिक रिअ‍ॅलिटी शो तुम्ही पाहायला हवे. त्यांचे लक्ष फक्त गाण्यावर आहे, परंतु केवळ हिंदी रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धकांची दु: खद कथा दाखविली जाते. त्यांचे लक्ष फक्त यावर आहे.

हे ही वाचा-

कोरोनावर सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या 2DG औषधाची किंमत ठरली, जाणून घ्या..

तारक मेहतातील कलाकारांचा वाद चव्हाट्यावर, सोशल मिडीयावर केले एकमेकांना अनफॉलो

१५ दिवसात १ कोटी ५ हजार देत माफी मागा, नाहीतर निलेश लंकेंनी मनसे पदाधिकाऱ्याला दिला इशारा


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: