अमिताभसोबत सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम करणारे गोगा कपूर बॉलीवूडमधून गायब का झाले? वेगळीच माहिती आली समोर

May 30, 2021 , 0 Comments

आजकालच्या चित्रपटांमध्ये खलनायक ही गोष्ट खुप कमी नसते. कारण आजकाल जास्तीत जास्त चित्रपट हे खऱ्या आयुष्यातील गोष्टींवर आणि अनूभवांवर निगडीत असतात. पण एक काळ असाही होता ज्यावेळी बॉलीवूडचे चित्रपट खलनायकाशिवाय पुर्ण होत नव्हते.

७० ते ८० च्या दशकातील प्रत्येक चित्रपट खलनायकाशिवाय पुर्ण होत नव्हता. चित्रपटामध्ये खलनायक असायचाच. हा खलनायक नेहमी हिरोची वाट लावायचा. पण खलनायकाला हे काम एकट्याला करता येत नव्हते. त्यामूळे त्याच्या मदतीसाठी अनेक लोक असायचे आणि ते ही खलनायक म्हणून ओळखले जायचे.

अशाच एका ७० आणि ८० च्या दशकातील खलनायकाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्या काळामध्ये प्राण आणि जीवन यांसारखे खलनायक होते. पण या सर्वांमध्ये त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. हे खलनायक आहेत रवींद्र उर्फ गोगा कपूर.

गोगा कपूर यांनी आपल्या अभिनयाने आणि दमदार आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. असे बोलले जाते की, अमरीश पुरीचा आवाज आणि अभिनय गोगा कपूरसारखा होता. हे दोघेही त्यांच्या दमदार आवाजासाठी खुप प्रसिद्ध होते.

गोगा कपूरचा जन्म गुजनवालमध्ये झाला होता. फाळणीनंतर गुजनवाल पाकिस्तानमध्ये गेले होते. गोगा कपूरला लहानपणापासूनच नाटकांची आवड होती. त्यामूळे त्यांनी खुप लहान वयात नाटके करायला सुरुवात केली.

गोगा कपूर यांनी अनेक नाटके केली. अनेक वेळा त्यांनी अमिताभ बच्चनसोबतसुद्धा नाटके केली. पण बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चनला लवकर आणि जास्त ओळख मिळाली. काही काळानंतर गोगा कपूर यांनी खलनायक म्हणून खुप जास्त प्रसिद्ध मिळवली होती.

१९७१ मध्ये ‘जलवा’ चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये गोगा कपूरने अभिनय केला. पण त्यांना काही खास यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांना चित्रपट मिळत होते. पण हवी तशी प्रसिद्धी मिळत नव्हती.

१९७३ मध्ये ‘एक कुवांरा एक कुवांरी’ चित्रपट आला होता. या चित्रपटात त्यांनी काम केले. हा चित्रपट हिट झाला. पण गोगा कपूरला प्रसिद्धी मिळाली नाही. त्यानंतर १९७३ मध्ये ‘जंजीर’ चित्रपट आला. हा चित्रपट सुपरहिट झाला. या चित्रपटाने बॉलीवूडला दोन कलाकार दिले एक म्हणजे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि दुसरे म्हणजे खतरनाक खलनायक गोगा कपूर.

त्या काळात बॉलीवूड चित्रपटांमध्ये मुख्य खलनायक असायचा आणि त्या खलनायकाचे अनेक माणसे असायची. त्या खलनायकाचा उजवा हात म्हणून गोगा कपूर प्रसिध्द झाले होते.

त्यांनी ७० आणि८० च्या दशकामध्ये त्यांच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट केले. त्यात त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली. मुक्कदर का सिकंदर, मिस्टर नटवरलाल, शान, दोस्ताना, याराना, सत्ते पे सत्ता, शक्ती, सागर, बेताब, मर्द हे त्यांचे सर्वात हिट चित्रपट होते.

या सर्व हिट चित्रपटांमध्ये गोगा कपूरचा यांचा दमदार अभिनय पाहायला मिळतो. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये सर्वात जास्त चित्रपट अमिताभ बच्चनसोबत केले आहेत. गोगा कपूरने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

७० आणि ८० च्या दशकातच नाही तर गोगा कपूरने ९० च्या दशकातसुध्दा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. जसे की, आमिर खानसोबत ‘कयामत से कयामत तक’ आणि सलमान खानसोबत ‘पत्थर के फुल’ या दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भुमिका निभावल्या आहेत.

गोगा कपूरने बॉलीवूडमध्ये १५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच त्यांनी तामिळ, तेलगू, कन्नड या भाषांच्या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. ते २००५ पर्यंत अभिनय क्षेत्रात सक्रिय होते.

पण त्यानंतर त्यांना आरोग्याशी निगडित अनेक समस्या सुरू झाल्या. २०११ मध्ये त्यांची तबियत खुप जास्त खराब झाली. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

बॉलीवूडमध्ये जेव्हा पण ७० आणि ८० च्या दशकातील चित्रपटांविषयी बोलले जाईल. त्यावेळी गोगा कपूर यांचे नाव नक्कीच घेतले जाईल. गोगा कपूर आज या जगात नसले तरी त्यांचे चित्रपट मात्र नेहमी आपल्या मनामध्ये जिवंत राहतील.


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: