आयुर्वेदाला ब्रँड बनवण्याची पहिली आयडिया १३२ वर्षांपूर्वी डाबरला सुचली

May 27, 2021 , 0 Comments

आज आपण ज्या ब्रॅण्डची सक्सेस स्टोरी जाणून घेणार आहोत त्या ब्रॅण्डच्या वस्तू आपल्या पणजोबा, आजोबा, वडिलांनी आणि आता आपणही वापरत आहोत. कारण या ब्रॅण्डने मागच्या एका शतकाहून अधिक काळ मार्केट गाजवलं आहे.

डाबर ब्रॅण्ड हा आपल्या दैनंदिन जीवनातल्या बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला आढळून येतो. एका साध्या वैद्याने सुरु केलेला हा ब्रँड भविष्यात देशाचा विश्वासाचा ब्रान्ड बनेल असं कुणालाही वाटलं नसेल. आज या ब्रँडचे शेकडो प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत. लोकांना रोजगार देत आहे. देशाचा हक्काचा ब्रँड बनला आहे.

तर या यशस्वी ब्रॅण्डची सुरवात होते ती कोलकातामधून. तिथे एक वैद्य राहत असायचे, आपल्या आयुर्वेदिक पद्धतीने ते लोकांना सर्दी, खोकला अशा किरकोळ आजारांवर गोळ्या औषध बनवून देत असे. त्यांचं नाव होतं एस के बर्मन, बॉलिवुडवाले बर्मन नाही तर वैद्य बर्मन.

एस के बर्मन हे १३२ वर्षांपूर्वी स्वप्न पाहायचे तो आजचा ट्रेंड आहे. नैसर्गिक गोष्टीचा वापर करा, औषध फवारणी केलेल्या गोष्टी खाऊ नका, प्राकृतिक गोष्टींचा अवलंब करा. इतक्या दूरदर्शी विचाराने त्यांचं स्वप्न आज सत्यात उतरत आहे.

१८८४ साली कोलकातामधल्या आपल्या क्लिनिकमधून लोकांना नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या गोळ्या आणि औषध विकत असे. कॉलरा, पोटदुखी, डोकेदुखी अशा अनेक बारीकसारीक आजारांवर ते गोळ्या बनवत असत. चूर्ण वैगरेसुद्धा ते विकत असे.

त्यावेळी त्यांनी आपल्या ब्रॅन्डचं नाव ठेवलं डाबर. का ?

तर बंगाली लोकं त्यांना डाक्टर बर्मन म्हणून बोलावत असे.

त्यांनी डाक्टरचा डा आणि बर्मनचा बर यांना एकत्र आणून तयार केला डाबर.

लोकांना त्यांच्या आयुर्वेदिक गोष्टी आवडू लागल्या आणि त्यामुळे शरीराला अपाय होत नसे. डॉक्टरी सोबतच त्यांचा हा व्यवसायही चालू लागला. १८९४ साली त्यांनी कोलकातामध्ये एक मॅन्युफॅक्चअरिंग प्लांट उभा केला. यामुळे मोठ्या प्रमाणावर आणि चांगल्या दर्जाच्या आयुर्वेदिक गोष्टी तयार होऊ लागल्या.

डाबर त्यावेळी अशा गोष्टी बनवण्यात व्यस्त होते कि ज्या मार्केटमध्ये कुठेच मिळू शकत नव्हत्या. कारण त्यावेळचे डॉक्टर रुग्णांना फळं खा, ह्या गोष्टी उकडून खा, अशा गोष्टी पाळा हे फक्त सल्लेच द्यायचे. मात्र डाबर यांनी याच्या गोळ्या बनवायला सुरवात केली त्यातून लोकांना फायदा होऊ लागला.

यशाच्या शिखरावर डाबर ब्रँड पोहचू लागला  होता. त्यावेळी बर्मन यांचा मुलगा सी. एल. बर्मन याने १९०७ साली एस के बर्मन यांच्या निधनानंतर हा ब्रँड पुढे चालू ठेवला. सी. एल बर्मन यांनी कंपनीला चांगल्या प्रकारे सावरलं. त्यांच्या नजरेखाली कंपनीने यशस्वी वाटचाल सुरु केली.

१९१९ साली त्यांनी डाबर ब्रॅण्डची पहिली आयुर्वेदिक लॅब सुरु केली. यामध्ये रिसर्च वैगरे गोष्टी करून प्रोडक्ट आणि क्वालिटीचा कल वाढता ठेवला. १९२० साली डाबरने दोन नवीन प्लांट उभे केले. एक नरेंद्रपुरमध्ये आणि एक बिहारमधल्या देवघरमध्ये. यामुळे तिथे  परिसराचं नावंच डाबरग्राम पडलं.

१९४० साली डाबर ब्रॅण्डने त्यांच्या लॅबमध्ये तयार झालेलय तेलाचा ब्रान्ड बाजारात लॉन्च केला. तो ब्रँड होता डाबर आमला तेल. लोकांमध्ये या ब्रॅण्डची लोकप्रियता अफाट होती आणि त्याची प्रचंड विक्री झाली. डाबर आमला तेलाने घराघरात जाऊन आपल्या प्रोडक्टची तुफान जाहिरात केली. या क्रांतिकारी प्रोडक्टनंतर डाबरने पुदीन हरा हे सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री केलं.

१९७२ साली बर्मन घराण्याने आपला बिझनेस दिल्लीला शिफ्ट केला. यामुळे संपूर्ण भारतात व्यवसाय वाढवता येईल असं त्यामागे धोरण होतं. १९७९ साली साहिबाबाद मध्ये डाबरने नवीन फॅक्टरी सुरु केली आणि तिथे डाबर रिसर्च अँड डेव्हलपमेंट [ DRDC ] सेंटर सुरु केलं. १९९३ साली हिमाचलमध्ये पहिलं हेल्थ केअर सेंटर सुरु केलं.

हेल्थ केअर, प्रोडक्ट डिव्हिजन आणि डाबर आयुर्वेद अशा तीन विभागात हा ब्रँड विस्तारला. पुढे अनेक छोट्यामोठ्या कंपन्या डाबरने विलीन करून आपला व्यवसाय पुढे नेला. २५० हुन अधिक जास्त प्रोडक्ट डाबर निर्माण करते आणि जगभरात वितरित करते.

डाबर,  वाटिका, हाजमोला रियल, फेम अशा अनेक गोष्टी डाबरच्या आहेत. १० हजाराहून अधिक लोकांना हा ब्रँड रोजगार देतो. १०००० हजाराहून अधिक रिव्हेन्यू डाबरचा आहे. एका साध्या क्लीनिकपासून आजचा सर्वात यशस्वी ब्रँड म्हणून डाबरची मार्केटमध्ये टॉपची जागा आहे.

हे हि वाच भिडू :

The post आयुर्वेदाला ब्रँड बनवण्याची पहिली आयडिया १३२ वर्षांपूर्वी डाबरला सुचली appeared first on BolBhidu.com.



Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: