स्वॅब टेस्ट करणाऱ्यांनी सावधान! बाहेर फिरताना दिसलात तर थेट सात बाऱ्यावर होईल कारवाई

May 28, 2021 0 Comments

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सध्या रेड झोनमध्ये आहे. राज्य सरकारने १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं आहेत. त्यात सिंधुदुर्गचाही समावेश आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी कडक निर्बंध हाती घेतले आहेत. अधिक माहितीनुसार, आता स्वॅब देणारी व्यक्ती बाहेर फिरताना आढळून आल्यास तब्बल दहा हजारांचा दंड अथवा संबंधितांच्या घरावर अथवा सात बाऱ्यावर थेट बोजा चढविण्यात येणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ही उपाययोजना केली जात आहे. पण या कडक नियमामुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्यातील १० ठिकाणी आता संस्थामक आयसोलेशन केलं जाणार असून यावर पूर्णपणे शासनाची करडी नजर असणार आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोना रुग्णसंख्येत निश्चित कमी येईल अशी आशा सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना आहे. दरम्यान, राज्यातील प्रमुख शहरांत जरी करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असली तरी राज्यातील १८ जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये असून या जिल्ह्यात करोनाचा रुग्णांची संख्यांही अधिक आहे. या जिल्ह्यांसाठी आरोग्य विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'रेड झोनमध्ये असलेल्या ज्या १८ जिल्ह्यांत पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे त्या जिल्ह्यांना दोन सूचना देण्यात आल्या आहेत. एक म्हणजे होम आयसोलेशन बंद करा आणि कोविड केअर सेंटर वाढवा, व दुसरी कोविड केअर सेंटर वाढवून सगळ्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये आयसोलेट करण्यात येणार आहे. १५ वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी २५ टक्के निधी हा करोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत,' असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसंच, राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्के इतका आहे तर, पॉझिटिव्हीटी रेटदेखील कमी होत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: