भाजपचे नेते आचार्य भोसलेंची भविष्यवाणी ठरली खोटी; ४० दिवसांनंतर पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मुख्यमंत्री पायावर उद्धव ठाकरे यांनी कारभार हातात घेतल्यानंतर त्यांचे सरकार पडणार अशी भविष्यवाणी भाजपच्या नेत्यांकडून केली जात होती.
एवढेच काय तर भाजप नेते आचार्य तुषार भोसले यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ४० दिवसात पदावरून पायउतार होणार असल्याची भविष्यवाणी केली होती. पण ४० दिवसांनंतर पण मुख्यमंत्री पदावर राहिल्यामुळे त्यांची भविष्यवाणी हवेत विरल्याचे दिसून आले आहे.
आचार्य तुषार भोसले यांनी मागच्या महिन्यात ७ एप्रिलला प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले होते.
त्यांनी पुढे म्हटले होते की, अनिल देशमुख यांना साधू हत्येचा तळतळाट लागला तसेच तुम्हालाही पाप फेडावे लागणार आहे. आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे यांचा आहे. ठाकरे सरकारची उलटगणती सुरू झाली आहे. 40 दिवसांच्या आत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल.
भोसले यांच्या बोलण्याचा काहीही परिणाम ठाकरे सरकारवर झाला नाही. उलट सरकार दिवसेंदिवस मजबूत झाल्याचे दिसून आले आहे. आघाडी सरकारमधील तीनही पक्षांचा एकमेकांशी चांगला सुसंवाद असून कामे पण मार्गी लागत असल्याचे दिसून आले आहे.
भाजपच्या नेत्यांनी आघाडी सरकारवर टीका केल्यावर तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्या टीकेचा समाचार घेत असल्याचे दिसून आले आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून होत असलेल्या भविष्यवाण्या मात्र हवेत विरताना दिसून येत आहेत. तुषार भोसले यांची भविष्यवाणी तूर्तास तरी फोल ठरली आहे.
ताज्या बातम्या
सोनूने सगळ्यांचा भरोसा तोडत लावला चूना, १३ जणांशी लग्न करून चिक्कार लुटलं
दिल्लीचे नाव जोपर्यंत इंद्रप्रस्थ ठेवले जात नाही तोपर्यंत देश संकटात असेल: सुब्रमण्यम स्वामी
अभिनव आणि श्वेताच्या भांडणावर तिच्या पहिल्या पतीने दिली प्रतिक्रिया; म्हटला असे काही की
0 Comments: