‘पा’ चित्रपटातील ही अभिनेत्री माहितेय.? म्हणाली होती ही शेवटची भेट, अपघातात झाला मृत्यू…
मुंबई । टीव्हीवरील रसनाची जाहिरात अनेकांना माहीत असेल. या अभिनेत्रीचे नाव सचदेव आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. दुर्दैवाने तरूणी आज आपल्यासोबत नाही. अगदी वयाच्या १४ व्या वर्षी तरूणीने जगाचा निरोप घेतला होता. यामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केले.
ज्या दिवशी तिचे निधन झाले, त्या दिवशी तिचा वाढदिवस होता. असे असताना तिला मृत्यूची चाहूल लागली होती का.? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. १४ मे २०१२ रोजी तिचे निधन झाले होते.
त्या दिवशी या तरूणीचा १४ वा वाढदिवस होता. त्या दिवशी ती आणि तिची आई विमानातून प्रवास करत होते. नेपाळच्या अग्नि एअर फ्लाइटचा सीएचटी विमानात ते होते. यामुळे एक दुर्दैवी घटना घडली.
अचानक या विमानाला अपघात झाला व विमानाचे तुकडे झाले. त्या अपघातात १५ लोक ठार झाले़ यात तरूणी व तिच्या आईचा सहभाग होता. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला होता. ही आपली शेवटची भेट आहे, असे ती जाताना मित्रांना मस्करीत म्हणाली होती, मात्र ती गोष्ट खरी ठरली आहे.
ती भेट खरोखरच शेवटची भेट असेन, असे कुणालाच वाटले नव्हते. त्यापूर्वी कधीही तिने त्यांना मिठी मारली नव्हती किंवा असा निरोप घेतला नव्हता. पण कदाचित तरूणीला नकळत का होईना तिच्या मृत्यूची चाहूल लागली असावी.
रसना, कोलगेट, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स मोबाइल, एलजी, कॉफी बाइट, गोल्ड विनर, शक्ती मसाला यासारख्या उत्पादनांसाठी जाहिरातींमध्ये तरूणीने काम केले होते. यामुळे ती सर्वांना परिचित होती.
‘पा’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या वर्गमैत्रिणीची भूमिका तिने साकारली होती. तिच्या जाण्याने फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. मात्र नियतीपुढे काही चालत नाही. अगदी कमी वयात तिने मोठे नाव कमवले होते.
ताज्या बातम्या
चित्रपटातील बोल्ड सीन्सवर कैची मारल्यामूळे यश चोप्रावर भडकली होती जुही चावला
आपल्या फाटक्या शुजचा फोटो क्रिकेटरने शेअर करताच प्युमा क्रिकेटने त्याला केली ही मदत
४० दिवसानंतर पण उद्धव ठाकरेंची खुर्ची स्थिर; आचार्य भोसलेंची भविष्यवाणी विरली हवेतच
0 Comments: