संजय दत्तला मिळाला युएईचा ‘गोल्डन व्हिसा’; हा बहूमान मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता

May 27, 2021 , 0 Comments

मुंबई | अनेक बॉलिवूड कलाकारांची दुबईमध्ये आलिशान घरे आहेत. संजय दत्तचेही दुबईत घर आहे. लॉकडाऊनच्या काळात जागतिक विमानसेवा बंद असल्यामुळे संजय दत्त पत्नी आणि मुलांसह दुबईत अडकला आहे. नुकताच संजय दत्तला युएईचा गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे.

संजय दत्तने आपल्याला दुबईचा गोल्डन व्हिसा मिळाला असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. याबाबत त्याने युएई सरकारचे आभार देखील मानले आहेत. दुबईचा हा व्हिसा मिळवणारा संजय दत्त हा बॉलिवूडचा पहिला अभिनेता आहे.

अभिनेता संजय दत्तने आनंदाची ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. शेअर करताना त्याने काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. त्याने फोटो शेअर करताना लिहिले आहे की, @GDRFADUBAI चे डायरेक्टर मेजर जनरल मोहम्मद अहमद अल मर्री यांच्या उपस्थितीत युएईचा गोल्डन व्हिसा मिळणं हा माझा मोठा सन्मान आहे.

तसेच, संजय दत्तने फ्लाई दुबईचे सीओओ हमद ओबैदल्ला यांचे देखील आभार मानले आहेत. विशेष म्हणजे गोल्डन व्हिसा मिळवणाऱ्या परदेशी नागरिकांना युएईच्या नागरिकांप्रमाणे अधिकार दिले जातात. तसेच युएईचा गोल्डन व्हिसा हा १० वर्षांच्या दिर्घ काळासाठी दिला जातो.

दरम्यान, रॉकी या संजय दत्तच्या पहिल्या चित्रपटापासूनच संजय दत्तचा बॉलिवूडवर प्रभाव पडला आहे. त्याचा स्टारडम केवळ आपल्या देशापुरता मर्यादित नाही. तर जगभर पसरला आहे. बॉलिवूडचा असलेला मोठा प्रभाव आणि संजय दत्तवरील अफाट प्रेम आणि निष्ठा असणारे त्याचे चाहते यांच्यामुळे त्याला हा फायदा झाला असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
१३०० वर्षांपूर्वी बनवलेल्या मंदिराची ही गोष्ट आली समोर; वाचून तुम्हीही जाल चक्रावून
आता डोक्याची कटकट मिटली! टोलवरून आता अवघ्या १० सेकंदात होणार सुटका, वाचा नवीन नियम
दिशा वाकानी अर्थात जुन्या दयाबेनला विसरून जातील सगळे! शोमध्ये येणार नवीन चेहरा, सोबत अनेक ट्वीस्ट

 


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: