nana patole vs dr. harsh vardhan: आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला, त्यांनी माफी मागावी: नाना पटोले
मुंबई: महाराष्ट्राच्या चुकीमुळे देशाच्या करोनाविरोधातील लढ्याला फटका बसला असे वक्तव्य केंद्रीय डॉ. हर्षवर्धन यांनी केले होते. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष टीकास्त्र सोडले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे. ( should apologize for insulting maharashtra says congress leader ) गेल्या वर्षभरापासून देशात करोनाचा उद्रेक झालेला आहे. या परिस्थितीत राज्य सरकार केंद्राकडे सतत लशीचा पुरवठा करावा अशी मागणी करत आहे. त्याच प्रमाणे सरकार आर्थिक मदतीचीही मागणी करत आहे. मात्र, काल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रावरच आरोप केला. त्या आरोपाचा आम्ही निषेध करत आहोत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे, त्या बद्दल आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, असे पटोले पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- करोनाचे आलेले संकट दूर करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असतानाही केंद्र सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाशी खेळत आहे, असा आरोपही पटोले यांनी केंद्र सरकारवर केला आहे. भाजपवरही साधला निशाणा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडताना त्यांनी भारतीय जनता पक्षावरही निशाणा साधला आहे. भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत असल्याचे ते म्हणाले. राज्यात रक्ताचा साठाही कमी आहे. आम्ही राज्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे घेत आहोत. त्याच प्रमाणे येत्या १४ एप्रिल या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीनिमित्त राज्यभर रक्तदान शिबिरे घेत असल्याचे ते म्हणावे. क्लिक करा आणि वाचा- तसेच काँग्रेस लवकरच करोनामुक्त बुथ हे अभियानही सुरू करत असल्याचे पटोले म्हणाले. तसेच काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात कोरोना वॉर रुम देखील सुरु करत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात कोरोना हेल्पलाईन सुरु होत असून मदत आणि पुनर्वसन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग या दोन्ही मंत्र्यांना आम्ही याची जबाबदारी देत आहोत अशी माहितीही पटोले यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: