म्यानमार पेटले! लष्कराकडून एकाच दिवशी ८२ लोकांची हत्या करून मृतदेहाचे रचले ढीग
म्यानमारमध्ये लष्करी उठावाचा निषेध करणाऱ्या ८२ जणांचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. येथील नागरिक सातत्याने लष्करी उठावाचा निषेध करत आहेत. यादरम्यान सुरक्षा दलांनी मोठ्या संख्येने आंदोलकांना ठार मारले असून लोकांना ताब्यातही घेतले आहे. लष्कराने लोकनियुक्त सरकार उलथवून टाकत सत्ता ताब्यात घेतली.
यावेळी एकाच दिवशी ८२ जणांची हत्या करण्यात आली. म्यानमारमधील यंगून शहराजवळ सुरक्षा दलांनी आंदोलकांवर रायफल ग्रेनेडने हल्ला केला. यामध्ये अनेकजण जखमी देखील झाले आहेत.
बगो शहरात सुरक्षा दलांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या सुरुवातीला लपवण्यात येत होती. सुरक्षा दलांनी मृतदेह एकावर एक रचले होते. तसेच आसपासचा परिसर ताब्यात घेतला होता.
या सर्व प्रकरणामुळे अनेक नागरिक शहर सोडून गेले आहेत. आतापर्यंत ६०० पेक्षा जास्त लोकांचे बळी घेल्याची माहिती देखील समोर आली आहे. लष्कराने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.
हे सर्व प्रकरण आँग सान सू ची यांच्या पक्षाने फेरफार करून निवडणूक जिंकली, असा दावा करत लष्कराने देशात सत्तापालट केले. मात्र निवडणूक आयोगाने लष्कराचा हा दावा फेटाळून लावला आहे. मात्र हिंसाचार सुरूच आहे. अनेकांचे जीव यामुळे गेले आहेत.
देशातील सत्तेतून बाजूला करण्यात आलेल्या नेत्यांनी संयुक्त राष्ट्रसुरक्षा परिषदेत लष्करावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. येथे आगामी दोन वर्षात पुन्हा निवडणूका होण्याची शक्यता आहे.
0 Comments: