प्लॅगच्या साथीचं उदाहरण देत मनसेचा सरकारवर निशाणा

April 04, 2021 0 Comments

मुंबईः राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं पुन्हा एकदा लॉकडाउनची टांगती तलवार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्री यांनीही लॉकडाउनचा इशारा देताच विरोधकांनी मात्र लॉकडाउनला विरोध केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन नको अशी भूमिका भाजपनंतर मनसेनंही घेतली असल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवरच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागले आहे. तर, राज्य सरकारच्या कारभाराची तुलना ब्रिटिशांच्या राजवटीतील रँडच्या कारभारासोबत केली आहे. वाचाः मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलं आहे. '१८९७ साली प्लेगची साथ आली त्यावेळी रँडनं लोकांवर कशाप्रकारचे अत्याचार केले याचा अनुभव राज्यातील जनता सध्याच्या काळात घेत आहेत,' असा टोला संदीप देशपांडेंनी लगावला आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर यापुढे लावण्यात येणारे निर्बंध हे शेवटचे असतील. यानंतर मुंबईत लॉकडाउन लावावाच लागेल, असा स्पष्ट इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. आता राज्य सरकारकडून शेवटचा प्रयत्न केला जाईल. मुंबईत लॉकडाउन लावण्याची सरकारची मानसिकता नाही. पण लोकांच्या जीवाचा प्रश्न असेल तर राज्य सरकारकडे दुसरा पर्याय नाही. अजून आम्ही लोकांना विनंती करत आहे. पुढचे दोन दिवस मार्केटमध्ये जाऊन निवेदन दिले जाईल. आम्हाला मजबूर करू नका, असे जनतेला आवाहन करणार असल्याचेही अस्लम शेख यांनी सांगितले. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: