रिलायन्सचा मदतीचा सपाट सुरूच! १००० बेडचे कोविड सेंटर उभारणार, उपचारही मोफत

April 30, 2021 , 0 Comments

मुंबई । देशात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. अनेकांना ऑक्सिजन बेड देखील उपलब्ध होत नाही. रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून अनेक रुग्ण उपचाराअभावी मृत्युमुखी पडत आहेत.

यामुळे आता अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. आता रिलायन्स फाऊंडेशननेही यासाठी पुढाकार घेतला आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये ऑक्सिजन पुरवठा करणारे १००० खाटांचे कोविड रुग्णालय बांधणार आहेत. या रुग्णालयात रूग्णांना मोफत उपचार सुविधा मिळतील, असे फाऊंडेशनने म्हटले आहे.

यामुळे आता अनेकांना याची मदत होणार आहे. रिलायन्सकडून गेल्या काही दिवसांपासून मोठी मदत केली जात आहे. तसेच मोफत ऑक्सिजन पुरवठा देखील त्याच्याकडून केला जात आहे.

आता त्यांनी म्हटले आहे की जामनगरमधील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय परिसरात आठवड्याभरात ४०० खाटांचे, तर येत्या दोन आठवड्यांत जामनगरमध्येच ६०० खाटांचे कोरोना सेंटर बांधले जाणार आहे. त्यांनी जारी केलेल्या निवेदनात याबाबत माहिती दिली आहे.

यावेळी नीता अंबानी यांनी सांगितले की, कोविडच्या दुसर्‍या लाटेचा सामना भारत करत आहे. आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध आहोत. आरोग्याशी संबंधित अतिरिक्त सुविधा पुरवणे ही काळाची गरज आहे. भविष्यात देखील रिलायन्सकडून मोठी मदत केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

याअगोदर रतन टाटा यांनी देखील मोठी मदत जाहीर केली आहे. तसेच अनेक उद्योजक, खेळाडू मदतीसाठी पुढे येत आहेत. यामुळे कोरोना लढ्यासाठी अधिक बळकटी येणार आहे.

ताज्या बातम्या

अक्षय कुमारचा विरोध असतानाही त्याच्या बहिणीने ५६ वर्षीय घटस्फोटीत व्यक्तीसोबत केलं लग्न, कारण..

पृथ्वी शाॅने पहील्याच षटकात सहाच्या सहा बाॅलवर चौकार मारत रचला विक्रम; ८२ धावांची तुफानी खेळी

“२४ तासात भाजपाकडून मला व माझ्या परिवाराला बलात्कार आणि खुनाच्या धमकीचे ५०० फोन”


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: