अकोला महापालिकेचा अजब कारभार, ड्रायव्हर झाला सहाय्यक आयुक्त

April 24, 2021 0 Comments

हर्षदा सोनोने । अकोला अकोला महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ड्रायव्हर या तांत्रिक पदासाठी पदोन्नतीची तरतूद नसताना या पदावरील एका कर्मचाऱ्याला थेट सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार देण्यात आल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. अकोला महानगरपालिका २००१ साली स्थापन झाल्यापासून येथील भ्रष्टाचाराची सातत्यानं चर्चा आहे. परंतु काही राजकीय पक्षांचा दबाव व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तसेच आयुक्तांच्या होणाऱ्या बदल्यामुळे आणि आतापर्यंत IAS दर्जाचा आयुक्त न मिळाल्यामुळं भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे पुढे काहीच झाले नाही. मात्र, सध्याचा प्रकार वेगळाच असल्यानं त्याची सर्वत्र चर्चा आहे. सन २००४ साली ड्रायव्हर या पदावर बदली होऊन मनपामध्ये दाखल झालेल्या एका व्यक्तीला मनपातील अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या जम्पिंग प्रमोशन देऊन थेट सहाय्यक आयुक्त करण्यात आलं आहे. वास्तविक पाहता ड्रायव्हर हे पद वर्ग ३ मध्ये मोडते. या पदाला बढतीची कुठलीही तरतूद नाही. असं असतानाही एका ड्रायव्हरला थेट सहाय्यक आयुक्तपदी बसवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे नवे सहाय्यक आयुक्त जिल्हाधिकारी असल्यासारखे आदेश काढत असल्याचे दिसून येत आहे. वाचा: महापालिकेच्या ऑडिट रिपोर्टमध्ये अनेक आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्यात जम्पिंग प्रमोशन झालेल्या अनेक अधिकाऱ्यांचे सर्व्हिस बुक अपडेट नसणे, माहिती लपविणे, जातीचे प्रमाणपत्राची पडताळणी न करणे, सर्व्हिस बुक सादर न करणे, एमएससीआयटी, एलएसजेडी, टी. सी. सादर न करणे अर्थातच त्या अनधिकृत असल्यामुळेच सादर न करणे, अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची माहिती सादर न करणे आदी त्रुटींचा समावेश आहे. परंतु त्याची माहिती महापालिका आयुक्तांना न देता परस्पर त्या आक्षेपांना उत्तर दिली जात असल्याची माहिती समोर येत आहे. कायद्यात तरतूद नसताना ड्रायव्हरला थेट सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार कसा सोपविला जातो? महापालिकेच्या नवनियुक्त आयुक्त निमा अरोरा या प्रकरणात आता काय कारवाई करतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: