'नजरचूक' सुधारली, घोडचुका कधी सुधारणार?; काँग्रेसचा केंद्रावर हल्लाबोल

April 01, 2021 0 Comments

मुंबई: 'बचतीवरील व्याजदर कपातीचा आदेश नजरचुकीने काढल्याचं सांगून तो मागे घेतल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार टीकेच्या रडारवर आलं आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली आहे. 'व्याजदर कपातीची नजर'चूक' १२ तासांत सुधारली, पण नोटबंदी, टाळेबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी व इंधन दरवाढ या उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका कधी सुधारणार? असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारला केला आहे. ( Attacks Modi Government Over Fuel Prices, GST and Demonetization) महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 'गेल्या सात वर्षांपासून देश चुकीच्या लोकांच्या हातात आहे. सरकार चालवण्याऐवजी फक्त चुकाच केल्या जात आहेत. नोटाबंदी, टाळेबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली GST ची अंमलबजावणी, इंधन दरवाढ या तर उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका आहेत त्या कधी सुधारणार? की देशाची वाट लावतच राहणार?,' असा संताप थोरात यांनी व्यक्त केला आहे. वाचा: पटोले यांनी देखील थोरात यांच्या सुरात सूर मिसळत सरकारवर हल्ला चढवला आहे. 'पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये फटका बसू नये म्हणून नजरचुकीच्या नावाखाली निर्णय तूर्तास मागे घेतला गेला आहे. मोदी सरकारचा आतापर्यंतचा अनुभव पाहता निवडणुकांनंतर पुन्हा हा निर्णय घेतला जाणार नाही असं ठामपणं सांगता येणार नाही, असं पटोले यांनी म्हटलं आहे. बचतीवरील व्याजदर कपातीचा निर्णय नजरचुकीने घेतल्याचे मोदी सरकार म्हणत असेल तर मागील सात वर्षापासून पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढवण्याची जी घोडचूक केली जात आहे. ती कधी सुधारणार? देशात यूपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर आजच्यापेक्षा दुप्पट असतानाही इंधनाचे दर स्थिर ठेवून जनतेला महागाईच्या झळा पोहचू दिल्या नाहीत. मोदी सरकारला अशा पद्धतीने जनतेला दिलासा देता आलेला नाही. हे सरकार सामान्य जनतेच्या हितापेक्षा मूठभर उद्योगपतींच्या हिताची जपणूक करणारे आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अदानीच्या फॉर्च्युनसह इतर कंपन्यांनी खाद्यतेलाच्या किंमती प्रचंड वाढवून सर्वसामान्य जनतेची लूट सुरू केली आहे. ती कधी थांबवणार?,' असा प्रश्नही पटोले यांनी केला आहे. वाचा: 'आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना मोदी सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करत लूट करत आहे. त्यात आणखी १८ रुपये रस्ते विकास सेसच्या माध्यमातून तर ४ रुपये कृषी सेसच्या माध्यमातून घेतले जात आहेत. करांशिवाय आज पेट्रोलची किंमत ३२ रुपये ७२ पैसे प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ३३ रुपये ४६ पैसे प्रति लिटर आहे. पण मोदी सरकारने डिझेलवर ८२० टक्के तर पेट्रोलवर २५८ टक्के एक्साईज ड्यूटी लावून पेट्रोलचे दर १०० रुपये लिटर तर डिझेलचे दर ९० रुपये लिटरपर्यंत वाढवले आहेत. एलपीजी सिलिंडर सुद्धा ८५० रुपयांच्या वर गेले आहे. ही घोडचूक सुधारून सामान्य जनतेला मोदी सरकार दिलासा देईल का?, अशी विचारणा पटोले यांनी केली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: