मुख्यमंत्र्यांसाठी आव्हाडांचं ट्वीट; भाजपनं लगावला टोला

April 03, 2021 0 Comments

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री यांच्यासाठी एक भावनिक ट्वीट केलं आहे. या ट्वीटनंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी जितेंद्र आव्हाड टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक भावनिक ट्वीट करत मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोत्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, असं आव्हाडांनी म्हटलं होतं. हाच धागा पडकत प्रवीण दरेकर यांनी आव्हाडांना व मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही टीका केली आहे. 'आज जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतात. पण, माझं तर म्हणणं आहे. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' म्हणणारे मुख्यमंत्री आपलं घर करोनापासून सुरक्षित ठेवून शकत नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. महाराष्ट्रातील करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकार संभ्रमावस्थेत आहे, असंही ते म्हणाले आहेत. 'आव्हाड म्हणतात २० लाख कोटी रुपयांपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले? आव्हाडांनी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले हे एकदा तपासून पाहावं. केंद्र सरकारने इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला अधिक मदत केली आहे. केंद्र सरकारने अन्नधान्यांपासून ते करोनाच्या लसीपर्यंत सर्व सुविधा महाराष्ट्राला दिल्या आहेत. त्याची आव्हाडांना कल्पना नसावी. पण आम्ही आव्हाडांना त्याची आकडेवारी पाठवून देऊ,' असं दरेकर यांनी म्हटलं आहे. 'करोनाची सुरवात झाली तेव्हापासून भाजपचा तळागाळातला कार्यकर्ता रस्त्यावर उतरला होता. जेव्हा सरकार क्वारंटाइन झालं होतं. करोनाचा पिक टाइम होता तेव्हा सरकार मातोश्रीत बसलं होतं. त्यावेळेला विरोधी पक्ष नेते, कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरुन लढाईत काम करत होते. त्यामुळं सरकार म्हणून आपण लोकांमध्ये जावं जेणेकरुन या आरोग्य व्यवस्थेला ठिकठाक करता येईल,' असा सल्लाही त्यांनी दिला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: