'मुंबईतील लोकल सेवा बंद होणार नाही, पण...'

April 02, 2021 0 Comments

मुंबई: राज्यात रुग्णांच्या वाढीचा आकडा दिवसाला ४० हजारांवर गेला आहे. त्यामुळं सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे. करोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी आणखी काय उपाययोजना करायच्या या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री यांनी मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती दिली. वाचा: राज्यात करोनाचा प्रादूर्भाव वाढत असला तरी लॉकडाऊनला विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही विरोध आहे. त्यामुळं संपूर्ण लॉकडाऊनचा पर्याय मागे पडला आहे. मात्र, निर्बंध अधिकाधिक कठोर करण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करत आहेत. गर्दी होणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळंच मुंबई लोकलबाबत सरकार काय निर्णय घेणार? लोकल पुन्हा बंद होणार का? याविषयी मुंबईकरांच्या मनात धाकधूक आहे. वाचा: विजय वडेट्टीवार यांनी आज याबाबत माहिती दिली. 'मुंबईतील लोकल पूर्णपणे बंद होणार नाही. मात्र, लोकल प्रवासावर काही निर्बंध लादले जातील. लोकल प्रवासाचं नियोजन वेगळ्या पद्धतीनं केलं जाईल. गर्दी नियंत्रणात ठेवतानाच लोकांची गैरसोय होणार नाही हे पाहिलं जाईल. मागील वेळी पश्चिम बंगाल व तामिळनाडूमध्ये अशा प्रकारचे नियोजन करण्यात आलं होतं, असंही ते म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. 'करोनाची आताची स्थिती भयंकर आहे. करोनाबाधितांमध्ये यावेळी २५ वर्षे वयाच्या आतील रुग्णांची संख्या जास्त आहे. लहान मुलांपर्यंत करोना पोहोचलाय. सरकारकडून उपाययोजना सुरूच आहेत,' असंही वडेट्टीवार म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: