‘बॉबी’ चित्रपटासाठी ऋषी कपूरला अवॉर्ड भेटला नव्हता तर त्यांनी तो खरेदी केला होता
अभिनेते ऋषी कपूर आज आपल्यामध्ये नाहीत. पण तरीही त्यांच्याबद्दल अनेक नवनवीन गोष्टी समोर येत असतात. त्यामुळे ते आपल्यात नसले तरी आपल्या त्यांच्या आठवणी मात्र नेहमी आपल्यासोबत असणार आहेत.
ऋषी कपूरने बॉबी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. हा चित्रपट हिट झाला होता आणि त्यांना चित्रपटासाठी पुरस्कार देखील मिळाला होता. पण हा पुरस्कार त्यांना अभिनयासाठी भेटलं नव्हता तर त्यांनी पुरस्कार खरेदी केला होता. तुम्हाला धक्का बसला असेल पण ही खरी आहे. जाणून घेऊया खर कारण.
हा किस्सा आहे १९७३ चा. ऋषी कपूरने ‘बॉबी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटामध्ये ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया मुख्य भुमिकेत होते. या चित्रपटाची निर्मिती ऋषी कपूरचे वडील राज कपूर करत होते.
रिलीजनंतर हा चित्रपट हिट झाला होता. त्यामूळे ऋषी कपूर स्टार झाले होते. पण ऋषी अगोदर पासूनच कपूर परीवारातील होते. त्यामूळे ते नेहमी लाईमलाइटमध्ये असायचे. पण या चित्रपटानंतर ते स्टार झाले होते. ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक लोकांना भेटत होते.
या कालावधीमध्ये ऋषी कपूरची भेट एका आवॉर्ड फक्शनच्या निर्मात्यासोबत झाली होती. त्या दोघांमध्ये अनेक वेळा बोलणे झाले होते. एका दिवशी तो व्यक्ती अवॉर्ड घेऊन आला होता.
त्या व्यक्तिने ऋषी कपूरला विचारले की, तुला हे अवॉर्ड हवे आहे का? त्यावर ऋषी कपूरने उत्तर दिले की, हा मला हे अवार्ड हवे आहे. यावर तो व्यक्ती म्हणाला की, हे अवॉर्ड मी तुला देईल. पण त्यासाठी तुला २० ते ३० हजार रुपये द्यावे लागतील.
ऋषी कपूर एका मोठ्या परीवारातील होते. त्यामूळे त्यांच्यासाठी २० ते ३० हजार रुपये देणे फार मोठी गोष्ट नव्हती. त्यांनी त्या माणसाला पैसे दिले आणि अवॉर्ड घेतले. त्यावेळी त्यांना ते अवॉर्ड घेऊन खुप आनंद झाला होता.
पण ऋषी कपूर यांचे म्हणणे होते की, ‘बॉबी चित्रपटानंतर मला इंडस्ट्रीमध्ये खुप प्रसिद्धी मिळाली होती. म्हणून मला अवॉर्ड हवा होता आणि मी हा अवॉर्ड एखादे खेळणे असल्याप्रमाणे खरेदी केला होता’. पण काही वर्षांनतर ऋषी कपूरला त्यांची चुक समजली होती.
कारण बॉबी चित्रपट रिलीज झाला. त्या वर्षी अमिताभ बच्चनचा ‘झंजीर’ चित्रपट रिलीज झाला होता. पण या चित्रपटासाठी त्यांना कोणतेही अवॉर्ड मिळाले नाही. कारण सगळे अवॉर्ड ऋषी कपूरला मिळाले होते.
१९७३ मध्ये अमिताभ बच्चनचा झंजीर चित्रपट रिलीज झाला होता. धर्मेंद्र यांचा ‘यादो कीर बारात’ चित्रपट रिलीज झाला होता. राजेश खन्नाचा ‘डाग’ चित्रपट रिलीज झाला होता. तर संजीव कुमारचा ‘कोशिश’ चित्रपट रिलीज झाला होता. पण कोणत्याच अभिनेत्याला अवॉर्ड मिळाले नव्हते.
कारण झंजीर चित्रपट १९७३ चा सर्वात हिट चित्रपट होता. या चित्रपटातून अमिताभ बच्चन खुप मोठे स्टार झाले होते. पण तरीही त्यांना चित्रपटासाठी आवॉर्ड मिळाले नाही. अवॉर्ड ऋषी कपूरला मिळाले होते. या गोष्टीचा खुलासा ऋषी कपूरने त्यांच्या ‘खुलम खुल्ला रुषी कपूर’ या पुस्तकामध्ये केला होता.
या पुस्कामध्ये त्यांनी लिहीले होते की, ‘वयाच्या २१ व्या वर्षी मला काही समजत नव्हते. बालशिपणामध्ये मी काही पैसे देऊन एक अवॉर्ड खरेदी केले होते. त्या वर्षी त्या अवॉर्डचे खरे हक्कदार अमिताभ बच्चन होते. पण माझ्या हट्टामूळे ते अवॉर्ड मला मिळाले होते. मला या गोष्टीचा खुप पश्चाताप आहे. बॉबी चित्रपट चांगला होता. पण त्या अवॉर्डचा मी खरा हक्कदार नव्हतो. म्हणून मी सर्वांची माफी मागतो.’
महत्वाच्या बातम्या –
अभिषेक बच्चनने सांगितले खरे कारण, ‘या’कारणामुळे त्याने कधी ऐश्वर्यासोबत किसिंग सीन नाही दिला
लाडकी दयाबेन दिशा वकानी पुन्हा एकदा दिसणार तारक मेहतामध्ये; पहा गरब्याचा स्पेशल व्हिडीओ
पहा अभिनेत्री लारा दत्ताच्या आलिशान घराचे फोटो; करोडो रुपये खर्च करुन सजवले आहे घर
कॉमेडीयन सुनील ग्रोवरची पत्नी दिसते अभिनेत्रीपेक्षाही सुंदर; पहा फोटो
0 Comments: