त्या ३५ जणांची भुतबाधा उतरली; अंनिसच्या प्रयत्नांना यश

April 04, 2021 0 Comments

जयंत सोनोने/ : जिल्ह्यातील नांदगावत खडेश्वर तालुक्यातील शिवरा या तीन हजार लोकवस्तीच्या गावातमध्ये काही दिवसांपुर्वी पारधी समाजातील सुमारे ३० ते ३५ महिला व पुरुषांच्या अंगात एकाच वेळी भूत संचारल्याच्या घटनेची वार्ता सर्वदुर पसरली होती. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते. तेथील स्थानिक मांत्रिकाने या सर्वांना भुताने झपाटलेले आहे अशी अफवा परिसरात निर्माण केल्याने संपूर्ण गाव दहशतीत होते. अखेर अंधश्रध्दा निर्मुलन समितीने गावात मार्गदर्शन व प्रबोधनाचा अँटीव्हायरस मारल्यानंतर ३० ते ३५ नागरीकांची भुतबाधा उतरल्याची माहिती समोर आली आहे. मंगरुळ चव्हाळाचे ठाणेदार व त्यांच्या संपूर्ण ताफा तसेच श्रीकृष्ण धोटे, प्रवीण गुल्हाणे, मतीन भोसले, ओंकार पवार या गावाती पोहचले. त्याठिकाणी एक सार्वजनिक कार्यक्रम मंदिराच्या परिसरात घेण्यात आला. याप्रसंगी मतीन भोसले यांनी कार्यक्रमाचे महत्व विषद केले. त्यानंतर ठाणेदार पडघन यांनी गावातील वातावरण शांत व सलोख्याचे ठेवण्याकरिता अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. अनिसंच्या कार्याची माहिती देत श्रीकृष्ण धोटे यांनी ग्रामस्थांना आपल्या चमत्काराच्या नादात कसे फसले जातो यांची प्रात्यक्षीक करुन माहिती दिली. स्थानिकांच्या बेड्यावर यवतमाळ जिल्ह्यातील काही नविन लोक शिवरा या गावात आले. त्यापैकी स्वत:ला भगत म्हणणारे गजाान भोसले व त्याचे वडीलयांनी सोने मिळवून देतो असे आमिष देऊन काही लोकांना आपल्या जाळ्यातमध्ये अडकवले. त्याचबरोबर ज्याच्या लोकांना ही बातमी मिळू लागली तंनी देखील भुताची बाधा झाल्याचे सोंग सुरु केले. त्यामुळे ही संख्या वाढत जाऊन ३५ पर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली. अखेर प्रबोधनाच्या अँटीव्हायरसने ३५ नागरीकांच्या अंगातील भुतबाधा बाहेर आली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: