चांगली बातमी! मेळघाटातील करोना रुग्णांची ऑक्सिजनची चिंता मिटणार

April 27, 2021 0 Comments

अमरावती: करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आरोग्यसुविधांच्या विविध कामांना गती दिली आहे. करोना रुग्णांवरील उपचारादरम्यान ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून जिल्ह्यात सहा ठिकाणी कायमस्वरूपी सुरू करण्यात येणार आहेत. मेळघाटातील तालुक्याचाही यात समावेश असून येथील प्रकल्पामुळं मेळघाटातील करोना रुग्णांच्या ऑक्सिजन पुरवठ्याचीही चिंता मिटणार आहे. (Six New ) वाचा: ऑक्सिजन निर्मितीसाठी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ई- टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ती प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता प्रकल्प निर्मितीला चालना मिळाली आहे. हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. विभागीय संदर्भ रुग्णालय व जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील काही उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये अशा पाच ठिकाणी वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीच्या कामाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मेळघाटातील धारणीसह पाच ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होऊन गरजू रुग्णांसाठी त्याचा उपयोग होणार आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला २५९ सिलिंडर इतक्या क्षमतेनं ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. वाचा: विभागीय संदर्भ रुग्णालयातील जिल्हा कोविड रुग्णालय (८८ सिलिंडर), जिल्हा सामान्य रुग्णालय (५८ सिलिंडर), अचलपूर उपजिल्हा रुग्णालय (४४ सिलिंडर), धारणी उपजिल्हा रुग्णालय (१९ सिलिंडर), तिवसा ग्रामीण रुग्णालय (१९ सिलिंडर) व नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयातील केंद्रात (३१ सिलिंडर) इतकी ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. यामुळं जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा भरून निघणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवून दिलेल्या मापदंडानुसार व मार्गदर्शक सूचनेनुसार ही ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: