..तर राजकारणात मोदींना उद्धव ठाकरेंचा आदर्श ठेवावा लागेल! प्रसिद्ध राजकीय विश्लेषकाचे मत
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्याचे वडील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीपेक्षा वेगळे असल्याची टीका भाजपकडून सतत केली जाते. म्हणूनच त्यांनी भाजपची साथ सोडली अशी टीका देखील केली जाते.
आता मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वसामावेशक विचारसणीकडे वाटचाल करायची असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदर्श समोर ठेवावा लागेल, असे मत राजकीय क्षेत्रातील जाणकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले आहे. मोदींच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल भाष्य करताना गुहा यांनी मोदींच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडून सांगितले आहेत.
यावेळी गुहा म्हणाले, मोदींना सर्व चांगल्या गोष्टींचे श्रेय घ्यायला आवडते. आपल्याला तज्ज्ञांपेक्षा जास्त कळतं असे मोदींना वाटतं असे निरिक्षण मोदींच्या स्वभावासंदर्भात बोलताना त्यांनी नोंदवले आहे. यावेळी अनेक गोष्टी त्यांनी उलगडून सांगितल्या.
कोरोना परिस्थिती आता इतकी गंभीर नसती तर पंतप्रधांनी त्यांची धोरणे भारतातील उत्तम साथरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तयार केली असती. सध्याची मोदींची धोरणं ही नाट्यमय आणि नेत्रदीप ठेवण्यास प्राधान्य दिले जात आहे, असेही गुहा यांनी मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
तसेच थाळ्या वाजवणे, दिवे लावणे, घरातील लाईट्स नऊ मिनिटांसाठी बंद करने हे सारे प्रकार म्हणजे लोकप्रियता आणि अंधश्रद्धा असल्याचेही गुहा यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा फार वेगळे आहेत. उद्धव ठाकरे आता राजकारनात समतोल राखण्यासाठी पुढे येत आहेत. त्यानी निश्चित करून यशस्वीपणे हा बदल घडवून आणला आहे. तसाच बदल मोदींना देखील करावा लागेल, असेही गुहा म्हणाले.
ताज्या बातम्या
जगनमोहन रेड्डींची मोठी घोषणा, महाराष्ट्राला देणार ३०० व्हेंटिलेटर, गडकरींनी मानले आभार
राज्यात अत्यावश्यक प्रवासासाठी आता लागणार ई-पास; असा काढा ई-पास
‘सॉरी..माहित नव्हतं कोरोना लसी आहेत’; चिठ्ठी लिहून चोरलेल्या लसी चोरट्यांनी आणून दिल्या परत
0 Comments: