पुण्याला केंद्राकडून नाही, तर राज्य सरकारकडून मिळाल्या कोराना लसी; महापौरांचा ‘तो’ दावा खोटा?

April 10, 2021 , 0 Comments

 

 

राज्यभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आता राज्यभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे, असे असताना पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे पुणेकरांसाठी कोरोनाच्या संकटात केंद्राकडून खास निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात होते.

अशात पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे पुण्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पुण्याला २ लाख ४८ कोरोना लस देण्यात आल्या आहे, तर रविवारी १ लाख २५ हजार  लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एक ट्विट करत म्हटले होते.

आता मात्र मुरलीधर मोहोळ यांचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले जात आहे. पुण्याला थेट केंद्राकडून नाही, तर राज्य सरकारकडून लसीचा पुरवठा केला गेला असल्याची माहिती मिळत आहे. पुण्याला राज्य सरकारकडून १ लाख लस मिळाल्या आहे. या सर्व लस राज्य सरकारच्या कोट्यातून देण्यात आल्या आहे.

दरम्यान, धन्यवाद, नरेंद्र मोदी सरकार ! केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरू झाला असून आज जिल्ह्यासाठी २ लाख ४८ हजार लस प्राप्त झाल्या आहेत. तर रविवारी १ लाख २५ हजार लस मिळणार आहेत. यात शहराला ४०%, ग्रामीणला ४० % आणि पिंपरी-चिंचवडला २०% टक्के लस मिळणार आहेत, असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले होते,  पण त्यांचा हा दावा आता खोटा असल्याचे म्हटले जात आहे.

पुण्यात कोरोना रुणांची दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक रुग्णालयात तर बेड सुद्धा उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे कोरोना रुग्णांना उपचारासाठी अडचणी येत आहे.

तसेच व्हेंटिलेटर असणाऱ्या बेडची संख्या कमी पडत चालली आहे. असे असताना कोरोनाचा प्रादुर्भावामुळे पुण्याची परिस्थिती आवाक्याबाहेर जाताना दिसून येत आहे. सध्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोना रुग्णांवर उपाचार करण्यासाठी पुण्यात जवळपास २१ हजार पेक्षाजास्त बेड उपलब्ध करण्यात आले आहे. पण यातील बहुतांश बेडला व्हेंटिलेटरच नाही.

 

महत्वाच्या बातम्या-

नियमित एक ग्लास कोमट दुधात गुळ टाकून पिल्याने होतात हे आश्यर्यकारक फायदे

‘त्या’ एका अटीमूळे भाग्यश्रीचे करिअर झाले होते खराब

राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: