भर पावसात सभा घेतली पाटलांनी पण लोकांना आठवण झाली शरद पवारांची, वाचा नेमकं काय घडलं?
सध्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत. त्या निवडणुकीचा प्रचारही जोरात सुरू आहे. भाजपचे आणि राष्ट्रवादीचे बडे नेते आपल्या उमेदरवाराला निवडून देण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहेत. रोज राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सभा पंढरपूरात होत आहेत. ११ तारखेलाही जयंत पाटलांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपूरच्या मतदार संघात सभा घेतली.
सभा काय नेहमीच असते. पण या सभेत वेगळेपण काय होते? ही सभा जयंत पाटलांनी भर पावसात घेतली होती. त्यांची सभा आणि भाषण पाहून सर्व लोकांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीच आठवण झाली. सगळ्यांना शरद पवारांची ती साताऱ्यातील सभा आठवली.
अनेक लोक म्हणाले की साताऱ्यातील त्या सभेच्या आठवणी आज पुन्हा ताज्या झाल्या. २०१९ ला शरद पवारांनी ही सभा घेतली होती. अंगावर पडणारे पावसाचे थेंब, डोक्यावर होणार विजांचा कडकडाट असा सगळा माहौल असताना त्यांनी कसलीच परवा केली नाही.
८० वर्षांच्या शरद पवारांनी ही सभा गाजवली होती आणि ही सभा ऐतिहासीक होती असेही काही लोक म्हणतात. त्यांच्या या सभेमुळे राष्ट्रवादीचा विजय झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनानंतर आता पुन्हा पंढरपूरात मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे.
या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी सभा घेतली. यावेळीही जोरात पाऊस आला, विजा कडकडाट झाला पण जयंत पाटील मात्र डगमगले नाहीत. त्यांनी आपले भाषण पुर्ण केले. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले की, मंगळवेढ्याला पाणी मिळावे यासाठी भारत भालके २००९ पासून प्रयत्न करत होते.
भाजप सरकारच्या काळात या मतदारसंघाचे पाणी गायब झाले. त्यावेळी मला मंत्री नाही केले तरी चालेले पण माझ्या मतदारसंघाला पाणी द्या अशी भुमिका त्यांनी घेतली होती. योगायोगाने जलसंपदा मंत्री झाल्यावर आणि आचारसहिता लागण्याआधीच आपल्या तालुक्याला दोन टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला.
इथल्या खासदारांनी गाव दत्तक घेतले पण ते कधीच इथे फिरकले नाहीत. परंतु भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना सुजलाम सुफलाम करण्याचा मानस आहे, असे जयंत पाटील भाषणात म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
जमावाचा हल्ला, शस्त्रे हिसकावण्याचा प्रयत्न; बंगालमध्ये सुरक्षा दलांनी लोकांना कसे मारले? वाचा..
जयंत पाटलांच्या भाच्यावर पत्रकाराच्या खूनाचा गंभीर आरोप, महाविकास आघाडी पुन्हा अडचणीत
प्रदीप शर्मा होते सचिन वाझेचे गुरू, त्याला परत सेवेत घेण्यासाठी घेतली होती भाजपच्या मंत्र्याची भेट
सेटवर अभिनेत्रींची झाली मारामारी, स्वराने मारली लाथ तर पुजा झाली रक्तबंबाळ
0 Comments: