आयसोलेशन केंद्रातून सुटणार असल्याचं कळताच तो नाचत सुटला! पाहा व्हिडिओ

April 06, 2021 0 Comments

मनोज जयस्वाल । संपूर्ण देश सध्या करोनाशी झुंज देत आहे. महाराष्ट्रात दररोज रुग्णांची विक्रमी वाढ भीतीत भर घालत आहे. अशा भीती व अनिश्चिततेच्या वातावरणात करोनाचे रुग्ण स्वत:ला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच एक सकारात्मक व्हिडिओ बुलडाणा जिल्ह्याच्या तालुक्यातील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. () वाचा: आयसोलेश वार्डात तो स्वतःला रोखू शकला नाही. त्याचा आनंद त्याच्या डान्समधून व्यक्त होत होता. त्याला आयसोलेशन वार्डातून सात दिवसांनंतर सुट्टी होणार असल्याच कळलं आणि तो नाचत सुटला. हा त्याचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. उमेश पारेखेडे अस नृत्य केलेल्या युवकाचे नाव आहे. सात दिवसानंतर त्याला शेगाव तालुक्यातील अलगाव केंद्रातून सोडण्यात येणार असल्याच कळताच तो इतका खूश झाला की त्याला आपला आनंद लपवता आला नाही. वाचा: बुलडाणा जिल्ह्यात मागील चोवीस तासात आढळून आलेले करोना संसर्गित आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालांमध्ये तब्बल ८९१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. बुलडाणा ३६७,खामगाव ४६, शेगाव ५९, देऊळगाव राजा ३७, चिखली ९५ , मेहकर ५०, मलकापूर ४४, नांदुरा ३८, लोणार ४४, मोताळा २४, जळगाव जामोद ३२, सिंदखेड राजा ४३, संग्रामपूर १२ असे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दोन करोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ४२ हजारांवर पोहोचली आहे. यापैकी ३५६६८ लोक बरे झाले आहेत, तर जवळपास ६ हजार रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: