एमआयडीसीच्या सर्व्हरवरील सायबर हल्ला रशियातून?

April 09, 2021 0 Comments

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या () सर्व्हरवर झालेला सायबर हल्ला सोव्हिएत युनियनमधील एका देशातून झाल्याची माहिती पुढे येत आहे. रशिया किंवा कझाकिस्तान या दोन देशांपैकी एका देशातून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक करण्यात आल्याचा अंदाज आहे. तांत्रिक पुराव्यांआधारे सायबर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. () ''द्वारे २१ मार्चला पहाटे अडीचच्या सुमारास एमआयडीसीच्या संगणकीय प्रणालीवर सायबर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे महामंडळाच्या मुख्यालयाबरोबरच १६ कार्यालयांतील यंत्रणा पूर्णपणे बंद पडली. इतकेच नाही तर हल्ला करणाऱ्याने एक ई-मेल करून खंडणीचीही मागणी केली. एमआयडीसीच्या सर्व प्रणाली ईएसडीएस (क्लाऊड सेवा देणारी कंपनी) आणि महामंडळांतर्गत स्थानिक सर्व्हरवर आहेत. या प्रणालींची सुरक्षा व देखरेख यासाठी 'ट्रेंड मायक्रो' या अॅण्टी व्हायरस प्रणालीचा वापर केला जातो. एमआयडीसीच्या मुख्यालयात लोकल सर्व्हरवर 'सायनॅक' (SYNack) या रॅनसमवेअरच्या माध्यमातून प्रवेश करून महामंडळाची संरक्षित माहिती त्यांनी ताब्यात घेतली. यामुळे सर्व्हर यंत्रणा आणि माहितीवर आधारित सेवा बंद पडल्या आहेत. त्यामुळे महामंडळाचे कर्मचारी तसेच ग्राहक यांना या माहितीचा वापर करता आला नाही, असे एमआयडीसीमार्फत काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट करण्यात आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सायबर हल्ल्यानंतर व्हायरसचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी एमआयडीसीच्या नेटवर्कवरून सर्व संगणकांची जोडणी थांबवण्यात आली. एमआयडीसीच्या वतीने केलेल्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी 'माहिती-तंत्रज्ञान कायदा, २००८ कलम ४३ (अ) (फ) व ६६ अन्वये' अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. तपासातून तपशीलाची अपेक्षा तांत्रिक पुराव्यांवरून आतापर्यंत केलेल्या तपासातून हा हल्ला सोव्हिएत युनियनमधून करण्यात आल्याचे दिसत असल्याचे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रशिया किंवा कझाकिस्तानमधून सर्व्हर हॅक केल्याचा संशय असून निश्चित जागा अद्याप समजली नसल्याचे हा अधिकारी म्हणाला. नेमका हा हल्ला कशासाठी केला? खंडणीचा मेल आहे मात्र यामध्ये रकमेचा उल्लेख का नाही? याबाबत सर्व माहिती तपासातून पुढे येईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: