रेमडेसिविरचा हिशोब मागणाऱ्या चाकणकरांना सुजय विखेंचं 'हे' उत्तर

April 27, 2021 0 Comments

अहमदनगर: ‘नगरचे खासदार डॉ. यांनी दिल्लीहून आणलेल्या बॉक्समध्ये नेमके काय होते? त्यांनी ही इंजेक्सन्स खरंच आणली असतील तर ती कोठे आणि कोणाला वाटली हे जाहीर करावे,’ अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा यांना डॉ. विखे यांनी उत्तर दिले आहे. त्यांचे नाव न घेता डॉ. विखे म्हणाले की, ‘माझी बांधिलकी नगर जिल्ह्याशी आहे. येथील लोकांना उत्तर देण्याची माझी जबाबदारी आहे. जिल्ह्याबाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला मी याचे उत्तर देणे लागत नाही.’ (Sujay Vikhe Reply To Rupali Chakankar over Remdesivir) वाचा: गेल्या आठवड्यात डॉ. विखे यांनी दिल्लीहून एका खासगी विमानातून रेमडेसिविर इंजेक्शन्स आणून नगर जिल्ह्यातील रुग्णालयांना दिली. त्यांनी स्वत:च तसा एक व्हिडिओ प्रसारीत केला. यावर शंका घेणारे ट्विट चाकणकर यांनी केले होते. ‘सध्या जनता सैरभर झाली आहे. अशा परिस्थितीत जनतेची चेष्टा करू नये. त्यामुळे विखे यांनी ज्या पद्धीने इंजेक्शन्स आणल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल केला, त्याच पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ करून जनतेची चेष्ठा करणे थांबवावे,’ असे चाकणकर यांनी म्हटले होते. वाचा: कर्जत तालुक्यातील आढावा दौऱ्याच्यावेळी बोलताना विखे यांनी चाकणकर यांचे नाव घेता आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. डॉ. विखे म्हणाले, ‘नगर जिल्ह्याने विखे कुटुंबियांना पन्नास वर्षे साथ दिली आहे. आम्ही फसवाफसवी केली असती तर लोकांनी आम्हाला अशी साथ दिली नसती. सध्या रेमडेसिविर बाबत जे राजकारण सुरू आहे, त्यामध्ये माझी जबाबदारी ही केवळ नगर जिल्ह्यातील जनतेशी आहे. मी जे काय उत्तर द्यायचे ते त्यांना देईल. या जिल्ह्यातील जनता आणि लोकप्रतिनिधी यांनी विचारले तर मी त्यांना उत्तर देईल. जिल्ह्बाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर द्यायला मी बांधील नाही. मुळात मी जो व्हिडिओ प्रसारित केला, त्यातच सर्व स्पष्ट केले आहे. व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर लक्षात येईल. किती इंजेक्शन्स आणली याबाबत उल्लेख नाही. त्यामुळे मी कोठे गेलो होतो, काय केले, त्या बॉक्समध्ये काय आणले, याबद्दल कोणीही टिप्पणी करू नये. ज्यांना शंका आहे, त्यांनी थेट बोलावे, मी व्यक्तीश: उत्तर देईन. मात्र, माझी बांधिलकी ही माझ्या नगर जिल्ह्यापुरती आहे,’ असेही विखे म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: