रात्रीस राजकारण चाले! अजित पवारांच्या भेटीगाठींमुळे पंढरपुरात भाजपला टेन्शन

April 09, 2021 0 Comments

सुनील दिवाण । पंढरपूरपंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी गुरुवारी दिवसभर सभांचा धडाका लावल्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी रात्री पंढरपूरमध्ये काही महत्त्वाच्या गाठीभेटी घेतल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे. अजित पवार यांनी ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केलीय हे यावरून दिसून आले. (Ajit Pawar in Action For Bypoll) वाचा: प्रचाराची शेवटची सभा संपवून अजित पवार हे काल रात्री पालकमंत्री दत्तात्रय भरणे व आमदार संजयमामा शिंदे यांना घेऊन पहिल्यांदा धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांच्या निवासस्थानी पोचले . येथे धनगर समाजाच्या अनेक नेते व प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधत राष्ट्रवादीच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. हा भाजपला पसंती देणारा मतदार अशी ओळख असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी तुमच्या मागण्या पूर्ण करून तुमच्या मागे उभे राहील असे सांगत त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. दत्तात्रय भरणे हे देखील धनगर समाजाचे असून त्यांना आधी पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि नंतर दोनवेळा आमदारकी व मंत्रिपद दिल्याने धनगर समाज आपलेसे करण्याचे बेरजेची खेळी पवार यांनी खेळली. यानंतर अजितदादांनी मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी जाऊन मनसैनिकांशी चर्चा केली. पोटनिवडणुकीत मनसे तटस्थ असल्याने मनसेची ताकद आपल्या मागे वळवण्याची दुसरी खेळी अजित पवार यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी जमले होते. वाचा: यानंतर अजित पवार यांनी थेट परिचारक गटाच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आणि चर्चा केल्याने भाजपला घाम फुटला. साधना भोसले या भाजपच्या चिन्हावर पंढरपूरच्या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत . त्यांचे पती आणि माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी यावेळी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावल्याने ते नाराज होते याचाच फायदा उठवत अजित पवार यांनी साधना भोसले यांची भेट घेतल्याने शहरात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. एकंदर अजित पवार आता आपले सर्व फंडे आजमावत असून कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकण्यासाठी त्यांनी ताकद पणाला लावली आहे. त्यांच्या झंझावातामुळे भाजपच्या अडचणी वाढवण्याची शक्यता आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस प्रचारात उतरण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच अजित पवार यांनी बेरजेचं राजकारण सुरू केलं आहे. आज दिवसभर अजित पवार मंगळवेढ्यात प्रचार व भेटीगाठी घेणार असल्याने भाजपची चिंता वाढली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: