लग्नात घुसून वऱ्हाडींवर कठोर कारवाई करणाऱ्या ‘त्या’ कलेक्टरचे भाजप सरकारकडून निलंबन

April 29, 2021 , 0 Comments

त्रिपुरा | देशात कोरोनाने गेल्या वर्षभरापासून हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोरोनामुळे देशावर एक मोठं संकट आलं आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन लॉकडाऊनची घोषणा करत आहे. लॉकडाऊनमध्ये कमी लोकांच्या उपस्थित लग्न, राजकीय सभा, अंत्यसंस्कार, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याची नियमावली करण्यात आली आहे.

अनेक ठिकाणी सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होतान दिसून येते. मात्र काहि ठिकाणी नियमांना केराची टोपली दाखवली जाते. जास्त लोकांच्या उपस्थित लग्न, सभा पार पाडत असल्याचं चित्र दिसत आहे.

त्रिपुरा राज्यातही अशीच एक घटना घडली होती. राज्यातील आगरताळा शहरात मोठ्या थाटात विवाह सोहळा सुरू होता. पाहूणे मंडळी मोठ्या संख्येने जमले होते. अशातच जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांना या शाही विवाह सोहळ्याची माहिती मिळाली आणि त्यांनी थेट पोलिस कर्मचाऱ्यांसह लग्न सोहळा ठिकाणी जाऊन नवरानवरीसह उपस्थित लोकांवर कारवाई केली होती.

पण आता राज्यातील भाजप सरकारने त्याच शैलेश कुमार यादव या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्रिपुरातील आगरतळ्याचे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी लग्नात घुसून वऱ्हाडींवर कारवाई केली होती. मात्र कारवाई दरम्यान वऱ्हाडींशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

त्यानंतर मुख्यमंत्री विप्लव देव यांच्या हस्तक्षेपाने यादवांवर कारवाई करण्यात आली. आयएएस अधिकारी शैलेश यादव यांच्याविरोधात भाजप आमदारांनीही निदर्शनं केली होती. या घटनेचा व्हिडीओ झाल्यानंतर काही जणांनी त्यांच्या दबंग कारवाईचं कौतुक केलं होतं, मात्र त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही केली. त्यामुळे शैलेश यादव यांनी माफीही मागितली होती. मात्र तरीही त्यांच निलंबन केले आहे.

जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांच्या निलंबणाची मागणी
सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निलंबणाची मागणी केली होती. कोरोना नियमांचे पालन करून विवाह सोहळा सुरू होता. जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी जबरदस्तीने घुसून अपमानजक भाषा वापरली आहे. यामुळे त्याचं निलंबन करण्याची मागणी नेत्यांनी केली होती.

सोशल मिडियावर सध्या जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नियम न पाळणाऱ्यांवर थेट कारवाई केल्याने अनेकांनी शैलेश कुमार यांचे कौतूक केले आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता लग्नात सोशल डिस्टन्सिंग दिसत नाही. तर कुणाच्या तोंडाला मास्कही लावलेला दिसत नाही.

विवाह सोहळ्यात त्यांनी नवरदेवाला मंडपातून ओढत बाहेर काढले आहे आणि पोलिसांना सांगून त्याला अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत नाईट कर्फ्यू सुरू आहे. लग्न सोहळ्याला रात्री १० पर्यंत परवानगी होती. त्यानंतरही कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे कारवाई केली. असं जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
मी जगलोय, आता त्या तरुणाला जगण्याची गरज; ८५ वर्षीय आजोबांनी केला ऑक्सिजन बेडचा त्याग
भारतातील कोरोना परीस्थीतीवर बोलताना अक्षरश ढसाढसा रडली शिल्पा शेट्टी; म्हणाली…
उतावळी नवरी! नवरा कोरोना पॉझिटिव्ह असून देखील पीपीई किट घालून केले लग्न
रिक्षा चालवून, संत्री विकून झाला करोडपती; गरीबीची जाणीव ठेवत आता पुरवला ४०० टन ऑक्सिजन


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: