मोदी सरकारला उच्च न्यायालयाने झाप झाप झापले, भीक मागा, चोरी करा पण ऑक्सिजन द्या
दिल्ली । ऑक्सिजन पुरवठ्यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला चांगलेच झापले आहे. भीक मागा, चोरी करा पण ऑक्सिजन द्या! उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला सल्ला दिला आहे. देशात कोरोनाने थैमान घातले असून आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे.
असे असताना ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि व्हेंटिलेटरचा तुटवडा अनेक राज्यात पडला आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी होऊ लागलेली असतानाच या मुद्द्यावरून आता दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले आहे.
दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलने दिल्ली उच्च न्यायालयात ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. यानंतर उच्च न्यायालयाने मोदी सरकारला तीव्र शब्दांत सल्ला दिला आहे. भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या, असे म्हणत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले आहे.
लोकांचे जीव सरकारसाठी एवढे महत्त्वाचे नाहीत का? ऑक्सिजनकडे दुर्लक्षामुळे आम्हाला धक्का बसला आहे. सरकारच्या प्रस्थापित स्त्रोतांमधून ऑक्सिजनची गरज भागत नसेल, तर ही सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दुसऱ्या मार्गांची सोय करावी, असे कोर्टाने म्हटले आहे.
जर पर्याय नसेल, तर देशातील उद्योगधंद्यांचा ऑक्सिजन वैद्यकीय उपचारांसाठी वळवा, असे निर्देश यावेळी कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. जर आवश्यक असेल, तर स्टील, पेट्रोलियम अशा उद्योगांकडून ऑक्सिजन उपचारांसाठी वळवा.
शक्य असेल तर हवाई मार्गाने देखील ऑक्सिजन वाहून नेता येईल, असे देखील कोर्टाने सांगितले आहे. यामुळे केंद्र सरकारने हालचाली सुरू करण्याची गरज आहे.
ताज्या बातम्या
राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू, आता कुठेही फिरता येणार नाही, जाणून घ्या नवीन नियम
गृहमंत्र्याच्या नावे ५ लाखांची खंडणी मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची होणार चौकशी
मयुरचं नशीबचं! रेल्वेकडून ५० हजार बक्षीस, तर जावा कंपनीकडून शानदार मोटरसायकल भेट
0 Comments: