भारीच! आता कोरोना काळात हे पाच पेय प्या आणि झटपट आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढवा

April 25, 2021 , 0 Comments

कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीत आपल्याला आपली रोग प्रतिकारकशक्ति वाढवणे खुप गरजेचे आहे. त्यामुळे अधिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल असे अन्न आणि पेय यांचे सेवन आपण केले पाहिजे. आज आपण अशा पेयांबद्दल जाणून घेणार आहोत जे पेय स्वादिष्ट ज्यांनी आपली रोगप्रतिकारकशक्ति वाढण्यास मदत होईल.

पुदीना ताक- उन्हाळ्यात ताक आणि लस्सीचे मोठ्या प्रमाणात सेवण केले जाते. हे पेय आपले शरीर थंड ठेवण्याचे काम करते. अशात जर आपण पुदीना युक्त असलेले ताक शरीर हायड्रेटेड ठेवते. तसेच हे ताक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासही हे ताक मदत करते. पुदीना सोबतच आपण जीरे टाकून पण हे ताक पिऊ शकतो, त्यामुळेही आपल्या शरीराला याचा फायदा होतो.

वाळ्याचे सरबत- वाळ्याचे सरबत पण उन्हाळ्यात चांगले असते. वाळ्याचे सरबत शरीर थंड ठेवण्यास मदत करते, तसेच या सरबतामुळे शरीर हायड्रेटेड राहते. पाणी, वाळ्याचा इन्सेन्स, साखर आणि हिरवा रंग यांच्या साहाय्याने हे सरबत बनवले जाते.या सरबतमध्ये लोह, मँगनीज व्हिटॅमीन बी ६ सारखे अनेक पोषक घटक असतात.

आंब्याचे पन्हे- उन्हाळ्यात आंब्याचे सेवण मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यासोबतच कैरी पासून बनवलेले आंब्याचे पन्हे पण आरोग्यासाठी फायदेशीर असते. या पन्ह्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती तर वाढतेच तसेच डिहायड्रेशन आणि अतिसाराची समस्याही यामुळे कमी होते.

बेलाचा रस- आपण उन्हाळ्यात पौष्टीक पुरक आहार घेणार असेल, तर तुम्ही बेलाचे सरबत पिऊ शकतात. बेलाच्या सरबतामुळे शरीर हायड्रेटेड राहते. या सरबतात फायबर, व्हिटॅमीन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह यांच्यासोबतच इतर घटक असतात.

हिरव्या भाज्यांचा रस- रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी पाले भाज्यांचे सेवन करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशावेळी तुम्ही पालक, काकडी आणि आवळ्याच्या रसाचे सेवण करु शकतात. पालक आणि आवळ्यात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमीन सी आणि बीटा कॅरोटीन असतात. यामुळे शरीराची रोग प्रतिकारकशक्ती वाढते.

दरम्यान, कोणताही उपाय करण्यापुर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ञ आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या-

जो बायडन यांच्यावर भारताला मदत करण्याचा दबाव वाढला; युएस चेंबर्सकडून भारताला लस देण्याची मागणी
डॉक्टरांचा सल्ला! प्रिस्क्रिप्शनवर लिहितात, एक झाड लावा ऑक्सिजन कमी पडणार नाही
धुणी भांडी करून मुलाला आईने शिकवले, आता मुलाने झोपडपट्टीतून गाठले थेट इंग्लंड, पण..


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: