राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू, आता कुठेही फिरता येणार नाही, जाणून घ्या नवीन नियम

April 22, 2021 , 0 Comments

मुंबई । राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. संध्याकाळी आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. १ मे पर्यंत हे कडक निर्बंध असणार आहेत. राज्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

यामुळे आता राज्य सरकारकडून आणखी नियम कठोर करण्यात आले आहेत. याकाळात सरकारने नवीन नियम लागू केले आहे. यामध्ये एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नागरिकांना प्रवेश बंदी. मात्र सबळ कारण असेल तर प्रवेश दिला जाणार. अत्यावश्यक सेवेतील लोकांना मात्र मुभा असेल.

किराणामालाची दुकाने, भाजीविक्री सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू राहणार. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त ५० टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचे उल्लंघन झाल्यास १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक लोकांसाठीच असणार आहे.

सरकारी कार्यलयात केवळ १५ टक्के उपस्थिती राहणार. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी कर्मचारी वाढवता येणार आहेत.

लग्नकार्यासाठी फक्त २५ लोकच उपस्थित राहू शकतात. कुठल्याही हॉलमध्ये २ तासांच्या आत लग्नकार्य उरकावे लागणार आहे. या नियमांचे उल्लघन केल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

या नियमांचे उल्लंघन केल्यास आता कडक कारवाई केली जाणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ठ केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात ही साखळी तोडायची असेल तर काळजी घ्यावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

आत्मनिर्भर महिला! या महिलांनी झेंडू फुलवून केली लाखोंची कमाई

कोरोनापासून बचावासाठी करू नका ‘हे’ घरगुती उपाय; तेच उपाय ठरताहेत जीवघेणे

कोरोनाग्रस्त पत्नीला बेड मिळण्यासाठी जवानाची वणवण भटकंती, म्हणाला, मी देशासाठी मरतोय आणि..


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: