दम्यावरील औषध ठरू शकते करोनावर उपयुक्त?

April 24, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई श्वसनविकार असलेल्या काही रुग्णांमध्ये वापरण्यात येणारे हे करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असे या प्रसिद्ध वैद्यकीय संशोधन पत्रिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासामध्ये म्हटले आहे. ब्रिटन, चीन या देशांमध्ये करण्यात आलेल्या या संशोधनानुसार सौम्य प्रकारची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक वेगाने होऊ नये यासाठी हे औषध गुणकारी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. करोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यामध्ये हे औषध साह्यकारी ठरू शकते, असे या अभ्यासकांनी म्हटले आहे. ज्या करोना रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे होती अशा प्रौढ व्यक्तींमध्ये सात दिवसांसाठी दिवसांतून दोन वेळा चारशे मि.ग्रॅ. डोस दिवसातून दोनवेळा श्वसनमार्गातून पंपाद्वारे आत देण्यात आला. रुग्णांच्या लक्षणांची तीव्रता अधिक गंभीर न झाल्याचे त्यात दिसून आले. रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना खाटा अपुऱ्या पडत आहेत, रुग्णालयामध्ये दाखल होण्याची वेळ योग्यपद्धतीच्या नियोजनामुळे रोखता येऊ शकेल का, यादृष्टीने या अभ्यासाकडे पाहिले जात आहे. १६ जुलै ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये १६७ रुग्णांमध्ये हे संशोधन करण्यात आले. त्यातील २१ जण वैद्यकीय निकषांची पूर्तता न करता आल्यामुळे यातून बाहेर पडले. ७३ जणांना हे देण्यात आले, ज्या गटामध्ये हे स्टेरॉइड वापरण्यात आले होते, त्यांच्यामध्ये बरे होण्याचा कालावधी हा एक दिवस कमी असल्याचे दिसून आले. हे स्टेरॉइड घेतलेल्या रुग्णांमध्ये ताप येण्याची वारंवारता कमी होती. ज्या रुग्णांमध्ये हे औषध दिले जाते त्यांना करोना संसर्गाच्या लक्षणांची तीव्रता चौदा दिवसांपेक्षा कमी कालावधीची असल्याचेही दिसून आले आहे. करोनासंसर्गाची लागण सुरू झाली तेव्हा अनेक रुग्णांनी स्टेरॉइडचा वापर थांबवायचा का, अशी विचारणा केली मात्र या स्टेरॉइड्समुळे दमा असलेल्या रुग्णांच्या फुप्फुसापर्यंत संसर्ग पोहोचत नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे इन्हेलर घेणाऱ्या दम्याच्या रुग्णांना तुलनेने कमी लागण झाली. ज्यांना करोनाचा संसर्ग झाला त्यांच्यात ती तीव्रता कमी होती. त्यामुळे दमा नसणाऱ्यांनी याचा वापर करावा का यावर अभ्यास करणे गरजेचे आहे, याकडे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. सीतेश रॉय यांनी लक्ष वेधले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: