अभिनायाबरोबेर खेळातही तरबेज होता महाभारतातील भीमा, जिंकले होते गोल्ड मेडल; जाणून आश्चर्य वाटेल

April 30, 2021 , 0 Comments

दूरदर्शनवरील सर्वात  लोकप्रिय मालिका ‘ महाभारत’ सर्वाना आठवत असेलच . दूरदर्शन हे त्यावेळी मनोरंजनाचे एकमेव साधन होत म्हणून ही मालिका प्रत्येक घरात बघायची. आज आपण त्या मालिकेत भीमाची भूमिका साकारणार्‍या नायकाची न ऐकलेली किवा पडद्यामागची  कहाणी जाणून आहोत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की भीम भूमिका साकारणारा कलाकार खऱ्या आयुष्यात ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा भारताचे प्रतिनिधित्व करणारा आयुष्यातील क्रीडापटू होते.

बी. आर. चोप्रा निर्मित महाभारत सिरीयल प्रत्येकाला परिचित आहे आणि नव्या पिढीतील लोक ज्यांना परिचित नव्हते त्यांनाही लॉकडाऊन दरम्यान ही सीरियल पाहण्याची आणि जाणून घेण्याची संधी मिळाली. परंतु अन्य दिग्दर्शकांनीही महाभारताची कथा मालिकांप्रमाणे बनविली आहे.  त्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात मालिका बनवणे अजिबात सोपे झाले नव्हते. पण बी. आर. चोप्रा आणि इतर सहकलाकारांनी  दिवस-रात्र परिश्रमांनी यशस्वी पार पडले.

आज आम्ही तुम्हाला महाभारत मालिकेत एक खास व्यक्तिरेखा साकारणार्‍या अभिनेत्याच्या जीवनाविषयी न ऐकलेली कहाणी सांगणार आहोत. पांडव मुलगा भीमाबद्दल बोलत आहोत.प्रवीण हा १९६०आणि च्या दशकात भारतीय अ‍ॅथलेटिक्सचा एक प्रसिद्ध चेहरा होता. त्याच्या लांबी आणि चांगल्या उंची मुळे तो  डिस्कस थ्रोअर बनला. त्याने १९६६ आणि १९७० मध्ये हाँगकाँगमध्ये झालेल्या आशियाई गेम्समध्ये भाग घेतला आणि सुवर्णपदक जिंकले.

प्रवीणने १९६६ मध्ये किंग्सटन येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तसेच १९७४ मध्ये तेहरानमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. याव्यतिरिक्त, त्याने १९६८आणि १९७२ मध्ये दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला.

आंतरराष्ट्रीय खेळांपर्यंत पोहोचणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रवीण जेव्हा त्याच्या पाठीमध्ये  वेदना होत होती तेव्हा तो करिअरच्या शिखरावर पोहचला  होता.१९६८ मध्ये ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी त्याच्यावर चाचणी झाली. चाचण्या दरम्यान त्याच्याशिवाय केवळ दोन लोकानी ( हंगेरियन आणि एक रशियन अथलीट ) ७० मीटर विक्रम नोंदविला.

खेळातील यशस्वी कामगिरीनंतर प्रवीण १९८० च्या दशकात अभिनयाकडे वळला. खेळातही  त्यांचे  कौतुक झाले. मी जिथे गेलो तिथे मला अफाट प्रेम दिसले. खेळ सोडल्यानंतरही मला माझ्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय राहायचे होते. मला स्पॉटलाइटमध्ये रहायचे होते. म्हणून मी सिनेमा निवडला, असे त्यांनी मिडीयाच्या माध्यमातून सांगितले.

रविकांत नागाई दिग्दर्शित ‘फर्ज’ या चित्रपटातून त्याने अभिनयाची सुरुवात केली. परंतु या चित्रपटात त्याचे कोणतेही संवाद नव्हते त्यामुळे त्यांचे लक्ष लागले नाही. त्यानंतर त्याला रक्षा चित्रपटात ब्रेक मिळाला. जेम्स बाँड-शैलीतील ज्येष्ठ अभिनेते जीतेंद्र यांच्या  चित्रपटात त्यांनी गोरिल्लाची भूमिका केली.

अमिताभ बच्चन यांच्या शहेनशाह या चित्रपटातही त्यांनी काम केले.  याशिवाय हम हैं जमाना, युध, करिश्मा कुदरत का, लोहा, मोहब्बत की दुश्मन वगैरे चित्रपटांतही  प्रवीणने महत्वाची  भूमिका साकारली होती.या सर्व चित्रपटांमध्ये प्रवीणने गुंडांची भूमिका केली होती, ज्याची लोकांना भीती वाटत होती.  पण ही प्रतिमा महाभारतातील भीमाच्या व्यक्तिरेखेने बदलली. त्यांच्या  काही मित्रांनी बी. आर चोप्रा यांच्याकडे भीमाच्या भूमिकेसाठी त्यांचे नाव सुचवले होते.

भीमाची भूमिका साकारणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते, अनेक दिवस ते कठीण शब्दांचा प्रयोग करून पाहत असे आणि नाही जमल्यास वहीच्या पानावर लिहून ठेवायचे. अश्याप्रकारचे परिश्रम त्यांनी प्रत्येक क्षेत्रात घेतले. भीमाच्या भूमिकेबद्दल आपल्या सर्वाना माहिती आहेच. अश्याप्रकारे खूप परिश्रम करून गदाधारी भीमाची भूमिका प्रवीण यांनी आपल्या समोर मांडली.

हे ही वाचा –

१८ वर्षांपेक्षा जास्त वय असले तरी ‘या’ लोकांनी कोरोना लस घेऊ नये; जाणून घ्या कारण

जास्तीची हाव न ठेवताचंद्र आहे साक्षीला मालिका झाली बंद; जाणून घ्या त्यामागचे कारण

भारतीय खेळाडूंना नाही पण परदेशी क्रिकेटपटूला दया आली, ऑक्सीजनसाठी दान केले ३७ लाख


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: