'महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा रोखणारे झारीतले शुक्राचार्य कोण?'

April 22, 2021 0 Comments

मुंबई: रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेला व तुटवड्यावरून राजकीय टीका-टिप्पणी सुरूच आहे. शिवसेनेचे खासदार यांनी आज या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. 'सर्व राज्यांना ऑक्सिजन, रेमडेसिविरची आवश्यक ती मदत दिली जाईल असं पंतप्रधान सांगतात. मग महाराष्ट्राला ते का कमी पडतंय? हा पुरवठा रोखणारे झारीतले राजकीय शुक्राचार्य कोण आहेत? महाराष्ट्राशी वैरभाव ठेवून ते लोकांच्या जिवाशी का खेळताहेत,' असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. वाचा: मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. करोना रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर हव्या असलेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न राज्यात सध्या गंभीर बनला आहे. त्यातच काल नाशिक महापालिकेच्या एका रुग्णालयात ऑक्सिजन टँकची गळती होऊन व्हेंटिलेटरवर असलेल्या २४ रुग्णांना जीव गमवावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर राऊत बोलत होते. 'महाराष्ट्रातच नव्हे तर एकूण देशातच परिस्थिती हातघाईची आहे. राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री केंद्र सरकारशी संवाद साधत आहेत. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केंद्र सरकारनं गांभीर्यानं विचार करायला हवा,' असं राऊत म्हणाले. वाचा: रेमडेसिविरच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपला लक्ष्य केलं. 'गुजरातच्या भाजप कार्यालयातून रेमडेसिविर जाहिरातील करून वाटण्यात आलं. एका राजकीय पक्षाला रेमडेसिविर मिळतं आणि सरकारांना मिळत नाही हे गंभीर आहे. केंद्र सरकार ही देशाची सर्वोच्च यंत्रणा आहे. त्यांची जबाबदारी सर्वात जास्त आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्राला रेमडेसिविर व आर्थिक मदत करायला हवी. बंगालच्या निवडणुकीत पैसा खर्च होऊ शकतो तर तो राज्यांना का मिळू शकत नाही? केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचा हक्काचा जो पैसा आहे, तो तात्काळ दिला जावा. महाराष्ट्राला पैशाची गरज आहे,' असं ते म्हणाले. आपण भलतेच उदार झालोय! देशात लसीचा तुटवडा असताना इतर देशांना लस पुरवली जात आहे. केंद्राच्या या धोरणाबद्दल संजय राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केले. 'आधी आपल्या देशात लस दिली पाहिजे, नंतर इतर देशांना उदारता दाखवता येईल. लसीसाठी लागणारा कच्चा माल भारताला पुरवायला अमेरिका तयार नाही हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. प्रत्येक देश आधी स्वत:चं हित बघतोय. आपण मात्र उदार झालोय,' असा टोला त्यांनी हाणला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: