धक्कादायक! गर्भवती पत्नीच्या पोटाला दगड बांधून त्याने तलावात फेकले, ५ दिवसांनंतर
म. टा. प्रतिनिधी, : पत्नीच्या चारित्र्यावर तो संशय घेत होता. अशातच ती गरोदर राहिल्याचे कळल्यावर त्याला संताप अनावर झाला. त्या रागातून त्याने केली. मृतदेह तलावात फेकून देताना तिच्या पोटावर दगड बांधला, जेणेकरून तो पाण्यावर तरंगू नये. मात्र काही दिवसांनी त्या पतीचे हे क्रूर कृत्य उघडकीस आले आणि पोलिसांनी त्याला अटक केली. पारनेरमध्ये ही घटना घडली. तालुक्यातील वाघवाडी येथे ही घटना घडली. चारित्र्याच्या संशयातून पतीने नंदा पोपट जाधव हिचा खून केला. आरोपी पोपट जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. चार वर्षापूर्वी नंदा जाधव हिचा पोपट जाधव याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर अपत्य होत नसल्याने आरोपी पोपट जाधव पत्नी नंदाला नेहमी त्रास देत होता. नंदा गरोदर राहिली. पाच महिन्यांची गर्भवती होती. ती गरोदर असल्याचे समजल्यानंतर आरोपी जाधव तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. याच कारणाने त्याने ३० मार्च रोजी नंदा हिच्या पोटाला दगड बांधून तलावात फेकून दिले. त्यानंतर पाच दिवसांनी ही घटना उघडकीस आली. घटनेनंतर आरोपी जाधव फरारी झाला होता. पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली. त्याने हत्येची कबुली दिली आहे. पारनेरचे पोलीस निरीक्षक घनशाम बळप तपास करीत आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: