नियमित एक ग्लास कोमट दुधात गुळ टाकून पिल्याने होतात हे आश्यर्यकारक फायदे
अनेकांना दुधाचे सेवन कश्या प्रकारेआणि कोणत्या पद्धतीने करावे याचे कोढे पडलेले असते. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असतो की गरम दूध प्यावे कि थंड प्यावे. बर्याच लोकांना गरम दूध पिणे आवडते आणि बर्याच लोकांना थंड आवडते. दूध हे आरोग्यासाठी सर्वात पौष्टिक पेय आहे. दुधामधील कॅल्शियम, प्रथिने, आयोडिन, पोटॅशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन बी १२ सारख्या पोषक द्रव्य असल्याने १ ग्लास दुधामुळे दिवसभर आपल्या पौष्टिक गरजा भागू शकतात.
एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की दूध हे कोमटच प्यावे. त्यातच आणखी भर म्हणजे कोमट दुधाबरोबर गुळाच्या सेवनाचे आरोग्यास खूप फायदे होतात. गुळ आणि कोमट दुधाच्या नियमित सेवनाने आरोग्य नेहमी निरोगी राहते. गाईच्या दुधासह गुळ मिक्स करून पिणे चांगले आहे, रात्री तुम्ही झोपायच्या आधी ते घेऊ शकता. गुळाचा २५ ते ३० ग्रॅमचा तुकडा ३०० मिली ( एक ग्लास ) कोमट दुधात घ्या.
कोमट दूध आणि गुळाचे फायदे :-
कोमट दूध आणि गूळ वजन कमी करण्यास मदत करते आणि गायीच्या दुधात फॅक्ट कमी असते यामुळे शरीरातील मेटाबोलिस्मला निरोगी ठेवण्यास मदत होते. कोमट दुधात गुळ मिक्स करून पिल्याने सकाळी पोट साफ होण्यास खूप फायदा होतो, आणि शरीरातील चरबी कमी होते.
कोमट दूध आणि गूळ खाल्ल्याने रक्त शुद्धीकरणास मदत होते, गुळामध्ये पित्तशामक गुणधर्म असल्याने रक्ताची उष्णता थंड होते आणि रक्त हे अशुद्ध होत नाही. नियमित गूळाचे दूध पिण्यामुळे शरीरात अँटीऑक्सिडेंटची कमतरता राहत नाही
दुधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते, त्यामुळे नियमित दूध पिल्याने शरीरात कॅल्शियम कमी निर्माण होत नाही. त्यात गुळ टाकून पिणे अतिशय उपयुक्त ठरते. दुधात कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होतात, आणि हात-पाय गुढगे दुखण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळते.
स्त्रियांमध्ये रक्ताची कमतरता नेहमी भासत असते त्यांच्यासाठी दूध आणि गुळ यांचा नियमित पिणे फायदेशीर आहे. विशेषतः मासिक पाळीच्या कठीण दिवसांमध्ये त्याचा वापर केल्यास खूप आराम मिळतो आणि रक्ताची कमतरताही दूर होते.
कोमट दूध पिण्यामुळे चांगली झोप येते. रात्री झोपायच्या आधी हलके कोमट दूध पिल्याने झोप चांगली मिळू शकते. दुधामध्ये असणारे आम्ल झोपायला कारक असणारे रसायने सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करते, जे मनाला शांत करते आणि शांत झोप येते.
0 Comments: