कोरोना झाल्यापासून ते बरे होण्यापर्यंत घरच्या घरी कसे घ्यावेत उपचार, जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

April 26, 2021 , 0 Comments

नवी दिल्ली । देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रशासनावर मोठा ताण आला असून आरोग्य सेवा कमी पडत आहेत. मात्र या सेवा पुरवत असताना अनेक गोष्टी समोर येत आहेत. एम्सच्या डॉक्टरांनी याबाबत अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.

एम्स डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे, की लोक भीती पोटी रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजन सिलेंडर विकत घेऊन घरात जमा करत आहेत. मात्र केवळ १० ते १५ टक्के कोरोना रुग्णांनाच याची आवश्यकता असते.

ते म्हणाले, कोरोना महामारी हा गंभीर आजार नाही, हे सर्वांना समजायला हवे. हा आजार केवळ १० ते १५ टक्के लोकांतच गंभीर रुप धारण करतो त्यांना रुग्णालयात नेण्याची आवश्यकता भासते. मात्र अनेकांनी गरज नसताना बेड आडवले आहेत.

सामान्य लक्षणे असली तर ताप, सर्दी आदींची औषधे घ्या, घरगुती उपचार करा, वाफ घ्या, योग करा. यातच आपण आपण आरामात ८-१० दिवसांत बरे व्हाल. ९० ते ९५ टक्के लेकांत सामान्य ताप, सर्दी, घसा खवखवणे, अंग दुखी सारखी लक्षणे असतात.

अशा लोकांना ऑक्सिजनची, रेमडेसिवीरची गरज भासत नाही. मात्र १० ते १५ टक्के लोकांत गंभीर संक्रमण होऊ शकते. अशा लोकांना ऑक्सिजनबरोबरच औषधांचीही आवश्यकता भासू शकते, यात रेमडेसिवीर प्लाझ्माही येतो. 5 टक्क्यांहूनही कमी रुग्ण असे असतात, ज्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवावे लागते.

जर आपले ऑक्सिजन सॅच्युरेशन ९४, ९५, ९७ एवढे असेल, तर ऑक्सिजन लावण्याची कसल्याही प्रकारची आवश्यकता नाही. जर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे, असे वाटत असेल, छातीत इन्फेक्शन आहे, असे वाटत असेल, तर पोटावर झोपा तरीही तुमचे ऑक्सिजन सेच्युरेशन वाढेल, असे गुलेरिया म्हणाले.

तसेच माध्यमाने पसरत असलेल्या अफवांपासूनही दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. रिकाम्या वेळेत प्रेरणदायी पुस्तके वाचल्यानेही हिंमत वाढते आणि कोरोना विरोधातील लढाईत बळ मिळते. असेही त्यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

अखेर बायडन प्रशासन नरमले! कोरोना लसीच्या निर्मितीसाठी कच्चा माल देण्यास अमेरीका राजी

कोरोनाने मुलाला हिरावले; ही वेळ दुसऱ्यांवर येऊ नये म्हणून आईवडीलांनी तोडली १५ लाखांची एफडी

बाॅलीवूड पुन्हा हादरले! पद्मभूषण विजेत्या बड्या संगीतकाराचे कोरोनाने निधन


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: