परमबीर सिंहांवर हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; पुराव्यासहीत पोलीस अधिकाऱ्याचे गृहमंत्र्यांना पत्र

April 27, 2021 , 0 Comments

मुंबई । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गेल्या काही दिवसात वादात सापडले आहेत. आता त्यांच्यावर अकोल्याच्या पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्याने केले आहेत. परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

या पत्रात परमबीर सिंग दिवाळीला भेट म्हणून प्रत्येक डिसीपीकडून ४० तोळे सोन्याची बिस्कीटे घेत असल्याचा धक्कादायक आरोप भीमराव घाडगे यांनी केला आहे. घाडगे सध्या अकोला नियंत्रण कक्षात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

त्यांनी पैसा अनेक ठिकाणी गुंतवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी परमबीर सिंग यांच्यावर आरोप करणारे पत्र समोर आले होते. त्यानंतर त्यांच्यावर आता मोठा आरोप करण्यात आल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

परमबीर सिंग यांच्यावरील हे आरोप हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचाही यात समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना याबाबत पत्र पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागालादेखील पत्र पाठवण्यात आले आहे. आता त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

या अधिकाऱ्याच्या पत्रामध्ये परमबीर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांच्या पत्नीचे इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. त्याठिकाणी त्यांनी हजारो कोटी गुंतवले आहेत, तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय करतो. त्याठिकाणी या भ्रष्टाचाराचे पैसे गुंतवण्यात आल्याचा आरोप या पोलीस अधिकाऱ्याने केला आहे.

अगोदर देखील त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते. त्यामुळे एकापाठोपाठ एक आरोपांमुळे आता परमबिर सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

चारच दिवसात टाटांनी देशाला दिलेला शब्द पुरा केला! ऑक्सिजन टँक घेऊन विमाने भारतात दाखल

ऑक्सिजन मिळत नाही अशी तक्रार करणाऱ्यांची संपत्ती जप्त करा; योगींचे भयानक आदेश

नोकरी सोडून सुरू केला स्टार्टअप, आता औरंगाबादचा मसाला झाला दमन-दिवला फेमस


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: